46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 5 तर परतायला 3, भारताची सगळ्यात स्लो ट्रेन तरीही तिकिटासाठी होतात भांडणे

India Slowest Train: एकीकडे देशात बुलेट ट्रेन धावण्याची तयारी जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे 46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 5 तासांपेक्षा जास्त वेळ घेणारी ट्रेन आहे.

| Jan 19, 2025, 15:47 PM IST

India Slowest Train: एकीकडे देशात बुलेट ट्रेन धावण्याची तयारी जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे 46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 5 तासांपेक्षा जास्त वेळ घेणारी ट्रेन आहे.

 

1/7

जगातील सर्वात हळू ट्रेन कोणती?

जगातील सर्वात स्लो ट्रेन इतकी हळू धावते की तिला 290 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे हे अंतर तुम्ही तुमच्या ऑटोमध्येही कापले तर तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचाल. 

2/7

सर्वात हळू ट्रेन

  एकीकडे भारतात ट्रेनचा वेग वाढवण्यावर भर दिला जात असताना एका ट्रेनकडे देशातील सर्वात स्लो ट्रेनचे बिरुद आहे. ही ट्रेन खूप स्लो आहे, पण तरीही लोक या ट्रेनमध्ये आनंदाने बसतात. तामिळनाडूतील मेट्टुपालयम स्टेशन ते उटी येथील उधगमंडला स्थानकापर्यंत धावणाऱ्या निलगिरी माउंटन एक्स्प्रेसचे नाव सर्वात स्लो ट्रेनच्या यादीत नंबर वनला आहे.

3/7

46 किमी चालण्यासाठी 5 तास लागतात

सर्वात हळू चालणाऱ्या या ट्रेनचे नाव आहे उटी-निलगिरी. ही ट्रेन 5 तासात 46 किमी अंतर पार करते, म्हणजेच 1 तासात फक्त 9 किमी अंतर कापते. ट्रेन डोंगर आणि उतारावरून जाते.

4/7

वाटेत 16 बोगदे, 250 पूल

  ही ट्रेन 46 किमीच्या प्रवासात 16 बोगदे, 250 पूल आणि 208  घुमावदार टर्न्समधून जाते.  या ट्रेनच्या प्रवासादरम्यान तुम्हाला पश्चिम घाटाची अनेक सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. यामुळेच याचा युनेस्कोच्या जागतिक वारसामध्येही समावेश करण्यात आला आहे.

5/7

जायला 5 तास, पण परतायला 3 तास

या ट्रेनची एक खास गोष्ट म्हणजे या ट्रेनला जायला 5 तास लागतात, पण परतायला फक्त साडेतीन तास लागतात, त्यामुळे ट्रेनला जाताना खडी टेकडी चढून जावे लागते. म्हणजेच जाताना या ट्रेनचा वेग ताशी 9 किलोमीटर राहतो. पण परतताना, उतार उतरताना वेग वाढतो.  

6/7

ट्रेनची वेळ काय आहे?

ही ट्रेन मेट्टुपालयम येथून सकाळी 7.10 वाजता सुटते आणि दुपारी 12 वाजता उटीला पोहोचते. परतीची ट्रेन उटीहून दुपारी 2 वाजता सुरू होते आणि 5.35 वाजता मेट्टुपालयमला पोहोचते.  

7/7

तिकीट किती आहे?

या ट्रेनचे भाडेही खूप कमी आहे. प्रथम श्रेणी प्रवासासाठी, तुम्हाला 545 रुपये मोजावे लागतील, द्वितीय श्रेणीचे तिकीट फक्त 270 रुपये आहे. प्रवास सुखकर व्हावा यासाठी आता कुशन सीट बसवण्यात आल्या आहेत.