तुम्हालाही पावसात भिजायला आवडतं ? पण त्याआधी जाणून घ्या, त्वचेवर होणारे 'हे' दुप्षरिणाम

Mansoon Skin Care Tips: पावसात भिजणं किती ही आनंद देणारं असलं तरी यामुळे त्वचारोग होऊ   शकतो.   

Jul 09, 2024, 15:35 PM IST

पावसात भिजायला सर्वांनाच आवडतं. बरेच जण पावसात फुटबॉल आणि क्रिकेट खेळणं पसंत करतात. मात्र पावसात भिजल्यामुळे अनेकांना स्कीनवर अ‍ॅलर्जी होते. 

 

1/8

वाढत्या प्रदुषणामुळे पावसाचं पाणी देखील दुषित झालं आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट त्वचेवर होतो.   

2/8

जसं की, त्वचा कोरडी पडणं, खाज येणं किंवा त्वचा अतिसंवेदनशील होणं असा त्रास होऊ शकतो. 

3/8

पावसात भिजताना चिखलाचा थेट संबंध पायांशी येतो, त्यामुळे पायांना जखमा होणं, जळजळणं किंवा लाल पुरळ येणं हा त्रास होतो. 

4/8

ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते, त्यांना पावसाळ्यात त्वचा विकाराचा त्रास जास्त जाणवतो. 

5/8

बाहेर जाताना रेनकोट किंवा छत्री न वापरल्याने बऱ्याचदा पावसात भिजणं होतं.  खूप वेळ ओले कपडे अंगावर राहतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. 

6/8

बाहेरुन घरी आल्यावर गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी. त्यानंतर त्वचेला मॉइस्चराइजर लावायला विसरु नये. 

7/8

पावसाळ्यात भिजण्याशिवाय देखील  आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

8/8

पावसामुळे अनेकदा पिण्याच्या पाण्यात दुषित होतं. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)