गर्लफ्रेंड सोबत दिसला ट्रम्पचा मुलगा, कोण आहे बेटीना अँडरसन?

ज्युनियर ट्रम्प आणि बेटीना अँडरसन गेल्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले असून दोघे डिसेंबर २०२४ मध्ये एकत्र दिसले होते.

तेजश्री गायकवाड | Feb 09, 2025, 15:28 PM IST

ज्युनियर ट्रम्प आणि बेटीना अँडरसन गेल्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले असून दोघे डिसेंबर २०२४ मध्ये एकत्र दिसले होते.

1/7

Trump Jr And Bettina Anderson: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा नुकताच एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. ट्रम्प ज्युनियर हे डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे मूल आहे.

2/7

सुपर बाउलमध्ये जुनिअर ट्रम्प आणि त्यांची गर्लफ्रेंड खूपच स्टायलिश दिसत होते. ट्रम्प जूनियर यांनी काळ्या रंगाचा कॅज्युअल लूज फिटिंग शर्ट घातला होता. अँडरसनने स्टायलिश डेनिम आउटफिट घातला होता. 

3/7

या लूकमध्ये हे कपल खूपच कम्फर्टेबल दिसत होते. दोघेही कॅमेऱ्यासमोर छान हसत हसत पोज देत होते. ज्युनियर ट्रम्प आणि बेटीना अँडरसन गेल्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले असून दोघे डिसेंबर २०२४ मध्ये एकत्र दिसले होते.

4/7

47 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हा ट्रम्प यांचा मोठा मुलगा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांची ती अपत्य आहे. जेडी व्हॅन्स यांच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

5/7

बेटिनासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी ट्रम्प ज्युनियर किम्बर्ली गिलफॉयलला डेट करत होते. दोघांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघांनी २०२२ मध्ये एंगेज केले होते, जे काही काळानंतर तुटले.  

6/7

बेटिनाचे ट्रम्प कुटुंबियांसोबतचे संबंध खूप चांगले असल्याचे बोलले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यालाही तिने हजेरी लावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांची आधीची पत्नी मार्ला मॅप्स हिनेही बेटीनासोबतचा एक फोटो शेअर केला असून तिला सुंदर म्हटले आहे.

7/7

बेटीना अँडरसन एक फॅशन मॉडेल आहे. त्याचे वडील हॅरी लॉय अँडरसन जूनियर हे एक श्रीमंत बँकर होते. त्याची आई इंगर एक प्रसिद्ध छायाचित्रकार होती. बेटिना 38 वर्षांची आहे. ती ट्रम्प जूनियरपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे.