MS Dhoni च्या रांची येथील घराला नवा लूक, भिंतीवर हेलिकॉप्टर शॉट सह नंबर 7

MS Dhoni Ranchi Home : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी हा अनेक क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील टाईद आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  घेतली असली तरी त्याची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. धोनीने त्याच्या रांची येथील घराला नवा लूक दिलाय. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Pooja Pawar | Feb 09, 2025, 09:23 AM IST
1/7

झारखंडची राजधानी रांची येथील व्हीव्हीआयपी रोड हरमू येथे महेंद्र सिंह धोनीचे घर आहे. धोनीने आपल्या घराला नवा लूक दिला असून सध्या त्याचे घर चाहत्यांचे आकर्षण ठरत आहे. 

2/7

धोनीने रांची येथील त्याचा घराच्या भिंतीवर 7 हा लकी नंबर लिहिलाय. तसेच बाहेरील भिंतीवर धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारतानाचा फोटो देखील आहे. जे लोकांचे खास आकर्षण ठरतंय.   

3/7

एवढंच नाही तर धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकिपर आहे त्यामुळे बॅटिंग शॉट्स सह त्याने विकेटकिपिंग करतानाचे काही फोटो देखील घरातील काचांवर लावले आहेत. घराला दिलेला नवा लूक पाहून कोणालाही कळले की हे भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीचे घर आहे.   

4/7

झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने 2009 मध्ये धोनीला घरासाठी ही जमीन दिली होती. ज्यावर धोनीने घर बांधले ज्याचं नाव 'शौर्य' ठेवण्यात आलं. परंतु सध्या धोनी आपल्या कुटुंबासह सिमलिया येथील फार्महाऊसवर राहतो. 

5/7

एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय. आयपीएल 2025 मध्ये सुद्धा धोनी चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणार असून यासाठी त्याने प्रॅक्टिस सुद्धा सुरु केली आहे. 

6/7

धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी टूर्नामेंटच्या सर्व महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.  यात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी यांचा समावेश आहे.   

7/7

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 264 सामने खेळून 5243 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 24 अर्धशतकं आहेत.