'ही' स्वप्न पाहिल्याने तुमचा भाग्योदय उजळतो, मिळतो श्रीमंत जोडीदार
DREAM ASTRO : जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल, ज्याला स्वप्ने पडली नसतील. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.
DREAM ASTRO : अनेकांना बरेचदा स्वप्न पडतात. काही जण स्वप्न बघून घाबरतात. तर काही जण स्वप्न पाहून आपल्या आपल्या विश्वात जगत असतात. दरम्यान, जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल, ज्याला स्वप्ने पडली नसतील. स्वप्न विज्ञानानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. ते भविष्यात घडणाऱ्या सुखद आणि दुःखद घटनांबद्दल सूचित करतात. ही चिन्हे समजली तर माणूस सतर्क राहून जीवन आनंदी करु शकतो.




स्वप्न पाहणे गैर नाही. किंवा एखादी गोष्ट स्वप्नात दिसली म्हणून घाबरुन जाऊ नका. बरेच स्वप्न खरं होऊ शकते. जर एखाद्या मुलीने स्वप्नात स्वतःला मित्राने दिलेले ब्रेसलेट घातलेले पाहिले तर तिचे लवकरच लग्न होईल. स्वप्नात एखादे मूल हाक मारताना दिसले, तर समजावे की त्याच्या प्रियकराने दुसऱ्या स्त्रीशीही संबंध प्रस्थापित केले आहेत.
