Dream Science: ही स्वप्नं म्हणजे जणू धोक्याचं निमंत्रण; पाहिल्यानंतर सावध व्हा!

Dreams Meanings: छोटं, मोठं, वाईट किंवा चांगलं स्वप्न ही प्रत्येकालाच पडतात. कधी कधी व्यक्तीला इतकी भीतीदायक स्वप्न पडतात की, झोपेतून जागं झाल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा झोपतच नाही. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक वाईट स्वप्नाचे संकेत हे वाईट नसतात. अनेकदा हे चांगलं देखील ठरू शकतं. स्वप्न शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाच्या बाबतीत, विस्त्रृत सांगितलं आहे.

Nov 26, 2022, 22:58 PM IST
1/5

जर कधी तुम्हाला स्वप्नामध्ये वयस्कर भीकारी व्यक्ती दिसला, तर तुम्हाला भविष्याबाबत सावध व्हायला पाहिजे. हे अव्यवस्थेचं प्रतिक आहे. हे तुमच्यातील वाईट गोष्टींबद्दल चेतावणी देतं.

2/5

जर तुम्ही स्वप्नात मासे पकडत असाल, तर ते शुभ मानलं जातं. मात्र तुम्ही कोणताही मासा पकडत नसाल तर ते चांगले संकेत मानले जात नाहीत.

3/5

स्वप्नामध्ये लीलाव होताना पाहणं हे चांगलं मानलं जात नाही. स्वप्नामध्ये लीलाव हा विनिमय आणि स्पर्धेचं प्रतीक मानलं जातं. अशावेळी तुमचे चांगले मित्र तुम्ही गमावू शकता. त्यामुळे सावधान राहा.

4/5

स्वप्नात तुम्ही भुंकणारा कुत्रा पाहत असाल तर ते शुभ आहे. भुंकणारा कुत्रा तुम्हाला आगामी धोक्यांची माहिती देतो.

5/5

तुम्ही स्वप्नात सफरचंद पाहत असाल तर हे शुभ आहे. सफरचंद हे व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. शिवाय यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं. (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)