Rohit Sharma करणार 'विराट' कमबॅक, फॉर्ममध्ये परतण्यासाठी करतोय 'हे' काम

फॉर्ममध्ये परतण्यासाठी Rohit Sharma जीममध्ये गाळतोय घाम, PHOTO आले समोर  

Nov 26, 2022, 20:04 PM IST

Rohit Sharma Fitness: T20 विश्वचषक मधील पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर आहे. आपल्या फॅमिलीसोबत (Family) वेळ घालवत आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज (batsman) रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत (World Cup) त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर त्याच्या कर्णधारपद (captaincy) आणि फिटनेसवरही (Fitness) प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता रोहित शर्माने फिटनेस मिळवण्यासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. 

1/5

Team India, cricket, T20 , World Cup, Rohit Sharma, Fitness, New Zealand, Bangladesh, Workout, Virat Kohli, Yuzvendra Chahal, Harbhajan Singh, Hardik Pandya, sports news

रोहित शर्माला न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडियाला बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यावर जायचे आहे. कर्णधार रोहित शर्मा यासाठी मेहनत घेत आहे. उत्तम फिटनेस मिळवण्यासाठी तो वर्कआउट (Workout) करत आहे.  

2/5

Team India, cricket, T20 , World Cup, Rohit Sharma, Fitness, New Zealand, Bangladesh, Workout, Virat Kohli, Yuzvendra Chahal, Harbhajan Singh, Hardik Pandya, sports news

नेटमध्ये घाम गाळताना रोहित शर्माचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहेत, ज्यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

3/5

Team India, cricket, T20 , World Cup, Rohit Sharma, Fitness, New Zealand, Bangladesh, Workout, Virat Kohli, Yuzvendra Chahal, Harbhajan Singh, Hardik Pandya, sports news

२०२२ च्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा वाईटरित्या फ्लॉप (Flop) झालेला दिसत होता. त्याच्या बॅटमधून धावा काढणे कठीण झाले. तो भारतीय संघाला दमदार सुरुवात करून देऊ शकला नाही. T20 विश्वचषकात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले.  

4/5

Team India, cricket, T20 , World Cup, Rohit Sharma, Fitness, New Zealand, Bangladesh, Workout, Virat Kohli, Yuzvendra Chahal, Harbhajan Singh, Hardik Pandya, sports news

रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवण्याची मागणी हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) सारख्या दिग्गजांनी केली आहे. संपूर्ण T20 विश्वचषक 2022 मध्ये रोहित शर्माने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांना बेंचवर ठेवले होते.  

5/5

Team India, cricket, T20 , World Cup, Rohit Sharma, Fitness, New Zealand, Bangladesh, Workout, Virat Kohli, Yuzvendra Chahal, Harbhajan Singh, Hardik Pandya, sports news

विराट कोहलीची (Virat Kohli) गणना जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये केली जाते. आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) शतक झळकावल्यानंतर त्याचा फॉर्म परत आला होता, आता रोहित शर्माही त्याच मार्गावर चालताना दिसत आहे. फिटनेस मिळवून त्याला फॉर्ममध्ये परतायचे आहे.