महाराष्ट्राच्या राजकारणात भाईगिरी! ठाकरे, पवार आणि राणे घराण्यातील भाऊ भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
प्रत्येक निवडणुकीची काही वैशिष्ट्ये असतात, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भावा भावांच्या जोड्या उतरल्या आहेत.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीची सरशी पाहायला मिळत आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राला मोठ्या राजकीय घराण्यांची परंपरा राहिलीय... विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्याही राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसतंय... काहीजण याआधी आमदार राहिले आहेत, तर काही नवीन चेहरे पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये भावा भावांच्या काही जोड्या रिंगणात उतरल्यात..
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809316-bigbro08.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809315-big-brother-croma-7.png)
काका विरुद्ध पुतण्या हा राजकारणातील संघर्ष बीड जिल्ह्यामध्ये नवीन नाही. बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये जयदत्त क्षीरसागर काका विरुद्ध संदीप क्षीरसागर पुतण्या असा 2019 मध्ये सामना पाहायला मिळाला. आता दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनीही बंडाचं निशाण फडकावलंय.. त्यामुळे दोन पुतणे काकांच्या विरोधात असं चित्र निर्माण झालंय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809313-bigbro04.jpg)
शरद पवारांच्या कुटुंबातील दोन बंधू दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून रिंगणात आहेत.. रोहित पवार हे दुस-यांदा कर्जत जामखेड मतदारसंघातून तर त्यांचे चुलत बंधू युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या निवडणुकीकडे राज्याच लक्ष लागलंय..
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809312-bigbro03.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809311-bigbro01.jpg)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात कुणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे रिंगणात आहेत.. तर त्यांचे चुलत भाऊ अमित राज ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत..
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809310-bigbro07.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809309-bigbro06.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809308-bigbro05.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/30/809307-bigbro02.jpg)