World Coconut Day : सुका की ओला, कोणता नारळ आरोग्यासाठी जास्त चांगला?

जागतिक नारळ दिनानिमित्त जाणून घेऊया नारळाचे महत्त्व. शरीरासाठी कोणतं नारळ सर्वोत्तम? 

नारळाचा फायदा फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील तितकाच फायदेशीर आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की, नारळ कसा चांगला सुका की ओला. आज जागतिक नारळ दिनानिमित्त जाणून घेऊया योग्य उत्तर. 

1/8

कल्पवृक्ष म्हटला जाणाऱ्या नारळाचा 2 सप्टेंबर रोजी 'जागतिक नारळ दिन' म्हणून साजरा केला जात आहे. आशियाई पॅसिफिक देशांमध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. 

2/8

ताजे नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असते. जे शरीरासाठी हायड्रेट राहण्यास मदत करते. 

3/8

ताज्या, ओल्या नारळात फायबरचे प्रमाण देखील सर्वात जास्त असते. जे पचनक्रिया चांगली करण्यासाठी मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी, ई आणि अनेक पोषकतत्व यामध्ये आढळून येतात. 

4/8

ताज्या नारळात असलेले एँटीऑक्सिडेंट शरीराचा इतर दूषित कणांपासून बचाव करतात. 

5/8

सुक्या नारळात निरोगी चरबी राहण्यास मदत होते. यामुळे शरीरातील एनर्जी लेवल वाढण्यास मदत होते. 

6/8

सुक्या नारळात प्रोटीनदेखील मोठ्या प्रमाणात आहे. स्नायू चांगले ठेवण्यासाठी सुके खोबरे मदत करते. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते जे एनीमियापासून वाचवते. 

7/8

तसेच सुक्या नारळात कॉपर देखील असते जे हाडांमध्ये तेल पुरवण्याचे काम करतात. 

8/8

आता प्रश्न पडेल की, सुका नारळ खावा की ओला. तर आपल्या डाएटमध्ये दोन्ही नारळांचा समावेश करावा. ओला नारळ जेवणात आणि सुक्या नारळाला स्नॅक्सच्या रुपात वापरु शकता.