PHOTO : 'या' अभिनेत्रीचं 21 व्या वर्षी तुटलं लग्न, 28 व्या वर्षी IT चा घरावर छाप, आज 45 कोटींच्या घरात आहे संपत्ती

चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या मनमोहक सौंदर्यासाठी आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाते. परंतु तिच्या खऱ्या आयुष्यातील अनेक रहस्य जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.    

Sep 01, 2024, 20:32 PM IST
1/6

रश्मिका आणि बहिणीमध्ये आहे 'इतक्या' वर्षांचं अंतर

रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 मध्ये कर्नाटकमध्ये झाला. त्यानंतर सोळा वर्षांनी तिच्या बहिणीचा जन्म झाला.रश्मिका मंदाना आणि तिच्या बहिणीमध्ये सोळा वर्षांचं अंतर आहे.

2/6

कसं सुरू केलं रश्मिकाने तिचं करिअर

आतापर्यंतच्या करिअरमध्ये 'पुष्पा', 'गीता गोविंदा'सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करून रश्मिकाने रसिकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली.

3/6

रश्मिकाला कसा मिळाला पहिला सिनेमातील रोल

मॅाडेलिंगच्या दरम्यान रश्मिका मंदानाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या मात्र पहिल्यांदा तिने त्या नाकारल्या. परंतु नंतर आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने 'किरिक पार्टी' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलं.  

4/6

रश्मिकाला सांभाळावा लागणार होता वडिलांचा व्यवसाय

वडिलांचा बिझनेस सांभाळण्याचा रश्मिकाचा विचार होता मात्र तिचा पहिलाचं सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्यानंतर तिच्याकडे सिनेमांच्या ऑफरची रांगच लागली.   

5/6

21 व्या वर्षी मोडलं लग्न

2016 मध्ये आलेल्या 'किरिक पार्टी' या सिनेमात रश्मिकाने रक्षित शेट्टी सोबत काम केलं. तिथेच त्यांच प्रेम जुळलं. 3 जुलै 2017 मध्ये त्यांनी खाजगी सोहळा करून लग्न केलं. मात्र सप्टेंबर 2018 मध्ये ते दोघे काही कारणाने विभक्त झाले.    

6/6

या अभिनेत्रीच्या घरी पडला होता आयटीचा छापा

रश्मिकाचं नेटवर्थ 45 कोटी रुपये 2020 मध्ये तिच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला होता. रश्मिका कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यात राहते.