'या' 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यासाठी वरदान

तांदळाचे हे 4 प्रकार आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहेत...चला तर जाणून घेऊया याचे फायदे.

Feb 04, 2024, 13:58 PM IST

आपल्याला फक्त पांढऱ्या रंगाचे तांदूळ माहीत आहेत. पण  बाजारात 4 रंगात तांदूळ मिळतात, या तांदळाचे खूप फायदे आहेत. याबद्दल सांगितलं आहे. 

1/7

भात हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक मानला जातो. भारतातील जवळपास सर्वच राज्यात भात शेती प्रामुख्याने केली जाते. भारतात बहुतांश भागात पांढऱ्या रंगाच्या तांदळाला मोठी पसंती आहे. 

2/7

असे असले काळ्या,लाल आणि तपकिरी रंगाच्या तांदळाची भातशेती काही ठिकाणी करण्यात येते. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी भात आहारातून काढून टाकण्यात येतो, पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि तुम्ही भात खाणारे असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.चला तर मग जाणून घेऊयात भाताचे प्रकार आणि त्याचे शरीराला होणारे फायदे 

3/7

महाराष्ट्रात कोकण आणि भारतात पंजाब, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती करण्यात येते. देशात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन हे पश्चिम बंगाल राज्यातून होते. 

4/7

पांढऱ्या रंगाचा तांदूळ

पांढऱ्या रंगाच्या तांदळाचा भात हा शरीराला ऊर्जा प्रदान करतो. एंटीऑक्सिडेंट आणि इतर आवश्यक पोषक तत्वे पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये मुबलक प्रमाणात असतात. कोकणपट्ट्यात भातशेती  प्रामुख्याने केली जाते. असं म्हणतात की, आजारी असलेल्या माणसाला भाताची पेज दिल्याने अशक्तपणा दूर होतो.      

5/7

तपकिरी रंगाचा तांदूळ

तपकिरी रंगाच्या तांदळामध्ये प्रोटीनची मात्रा मुबलक प्रमाणात असते. याशिवाय तपकिरी रंगाचा तांदूळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाची समस्या होत नाही. 

6/7

लाल रंगाचा तांदूळ

सर्वसाधारण असा समज आहे की, भात जास्त खाल्ल्याने वजन वाढते मात्र लाल रंगाचा तांदूळ खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी लाल रंगाचा तांदूळ बेस्ट आहे. त्याशिवाय लाल रंगाच्या तांदळात लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

7/7

काळ्या रंगाचा तांदूळ

काळ्या रंगाच्या तांदळामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हृदय आणि यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.  (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)