मंदिरा बेदीचं 52 व्या वर्षी आतापर्यंतच सर्वात बोल्ड फोटोशूट

Entertainment : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे मंदिरा चर्चेत आली आहे. वयाच्या 52 व्या वर्षी मंदिरा बेदीने आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट केलं असून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

| Oct 02, 2024, 17:45 PM IST
1/8

मंदिरा बेदीचं 52 व्या वर्षी आतापर्यंतच सर्वात बोल्ड फोटोशूट

2/8

मंदिरा बेदी बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे जिच्या वयाचा अंदाज लावणं कठिण आहे. आजही मंदिरा तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. आता  वयाच्या 52 व्या वर्षी मंदिरा बेदीने आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट केलं असून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. 

3/8

मंदिरा बेदीने केलेलं फोटोशूट पाहून कॉन्फिडन्से वयावर मात केल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. या फोटोशूटमध्ये मंदिराने वेगवेगळे अंदाज पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या मंदिराचे हे फोटो चांगलाच व्हायरल झाले आहेत. 

4/8

मंदिरा आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देते. टीव्हीपासून चित्रपटांपर्यंत मंदिराने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. पण गेल्या बराच काळ ती स्क्रीनपासून दूर आहे. आता बऱ्याच काळानंतर मंदिरा पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आली आहे. 

5/8

मंदिरा बेदीने टीव्ही मालिकेतून घराघरात ओळख मिळवली. बॉलिवूडमधल्या एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही मंदिरा बेदीची लोकप्रियता वाढली होती. 'शांती' ही तिची मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर 'औरत', 'दुश्मन' आणि 'क्यों कि सास भी कभी बहू थी' या मालिकेतूनही तीने काम केलं.

6/8

यानंतर तीला मोठा ब्रेक मिळाला. यशराज चोप्रा यांचा बॉक्सऑफिसवर तुफान हिट ठरलेला चित्रपट दिलवाले 'दुल्हनिया ले जाएंगे' मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. यानंतर तीने अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तीने आपल्या अभिनयाची जादू केली.

7/8

अभिनयाबरोबर मंदिरा बेदी क्रीडा क्षेत्रातही लोकप्रिय झाली. 2003 मधल्या एका क्रिकेट स्पर्धेची होस्ट म्हमून तीने काम केलं. त्यावेळी मंदिरा बेदी ही मोजक्या महिलांमध्ये होती, ज्यात तीने टीव्हीवर एका क्रिकेट स्पर्धेच्या होस्टचं काम केलं होतं.

8/8

मंदिरा बेदीने आपलं शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून इकोनॉमिकची पदवी घेतली. मंदिरा बेदीकडे पत्रकारितेचीही पदवी आहे 2014 मध्ये मंदिराने लॅक्मे फॅशन वीकदरम्यान साडी कलेक्शन लाँच करत पॅशन डिझानयर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो आभार - idivaofficial)