कोणी ढाब्यावर काम करायचं तर कोणी होतं शिपाई...; आज 'हे' अभिनेते ठरलेत बॉलिवूडची शान

प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यात अभिनय क्षेत्रात स्वत: चं स्थान निर्माण करण्याआधी त्यांचं जे काही स्ट्रगल असतं ते नंतर हळू-हळू सगळ्यांसमोर येतं किंवा या क्षेत्रात काम करणं हे तितकंच कठीण असतं. चला तर आज आपण बॉलिवूडच्या अशा 6 अभिनेत्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी खूप स्ट्रगल केलं. 

| Oct 02, 2024, 17:34 PM IST
1/7

अनिल कपूर

अनिल कपूर हे गेल्या 4 दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण हे फार कमी लोकांना माहित आहे की त्यांना देखील यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकवेळ होती जेव्हा मुंबईत राज कपूर यांच्या गराजमध्ये अनिल कपूर यांना रहावं लागलं होतं. त्यानंतर 'वो सात दिन' या चित्रपटानंतर त्यांचं नशिब पालटलं. 

2/7

रजनीकांत

रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत वयाच्या 73 व्या वर्षी देखील ते चित्रपट करताना दिसतात. 5 दशकांपासून सगळ्यांचे मनोरंजन करणारे रजनीकांत अभिनयाच्या आधी कंडक्टर, कुली आणि सुतार म्हणून काम केलं. 

3/7

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता होण्याआधी नवाजुद्दीन हा शिपाई होता. त्याशिवाय त्यानं केमिस्टच्या दुकानात काम केलं, मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे घेतले. 

4/7

'सरफरोश', 'शूल' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस'सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याला खरी ओळख ही 'गैंग्स ऑफ वासेपुर' मुळे मिळाली आणि त्यानं कधीच मागेवळून पाहिलं नाही. 

5/7

बोमन ईरानी

बोमन ईरानीनं आजवर फक्त तेलगु, तमिळ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एक वेटर म्हणून काम केलं आहे. 

6/7

संजय मिश्रा

संजय मिश्रा यांनी त्यांच्या अभिनयानं लोकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी आजवर वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा ते ढाब्यावर ऑमलेट बनवण्याचे काम करायचे. 

7/7

अरशद वारसी

अरशद वारसीला 'मुन्नाभाई एमबीबीएस' च्या सर्किटच्या भूमिकेसाठी ओळखतात. त्याआधी अरशद वारसीनं लोकल आणि बसमध्ये नेल पॉलिश आणि लिपस्टिक विकल्याचे म्हटले जाते.