विराट-अनुष्काच्या लग्नावर 100 कोटींचा खर्च, पाहा इतर सेलिब्रेटिंनी किती खर्च केला
Bollywood Expensive Wedding : बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमध्येही आपली छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनसने लग्ना 6 वर्षांनी लग्नावर किती खर्च करण्यात आला होता, याचा खुलासा केला आहे. प्रियंका-निकने लग्नावर कोट्यवधींचा खर्च केला. पण तुम्हाला माहित आहे का केवळ प्रियंका-निकच नाही तर इतर सेलिब्रेटिंनीही लग्नावर पाण्यासारखा पैसा उधळला आहे. जाणून घेऊयात बॉलिवूडमधल्या टॉप एक्सपेन्सिव वेडिंगबाबत
1/5

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने भारतात येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांनी भारतातील राजस्थानमधल्या उम्मेद भवन इथं सात फेरे घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका आणि निकने आपल्या लग्नावर जवळपास 3.5 कोटी रुपये खर्च केला होता. प्रियंकाने फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान केला होता. शादी फिव्हरच्या रिपोर्टनुसार प्रियंका चोप्राचा लेहंग्याची किंमत 18 लाख रुपये इतकी होती.
2/5

बॉलिवूडचं टॉप कपल दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंहने इटलीतल्या महागड्या व्हिलात शाही विवाह केला. या व्हिलाचं नाव जेल बालबियानेलो असं होतं. या व्हिलाचं एका रात्रीचंच भाडं लाखोंच्या घरात आहे. दीपिकाने फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझायईन केलेल कपडे परिधान केले होते. लेंहग्याची किंमत जवळपास 9 लाख रुपये इतकी होती. या कपलने आपल्या लग्नावर तब्बल 77 कोटी रुपये खर्च केले.
3/5

सेलिब्रेटीमध्ये सर्वात महागडं लग्न ठरलं ते अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं. या दोघांन 2017 मध्ये सात फेरे घेतले. 800 वर्ष पुरतान असलेल्या हॅरिटेजमध्ये विवाह सोहळा पार पडला. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार या कपलने लग्नावर तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले. अनुश्काचा लेहंगा फॅशन डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केला होता. या लेहंग्याची किंमत 30 लाख रुपये इतकी होती.
4/5
