महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे फिरताना येतो काश्मीरचा फिल, नौका विहार म्हणजे जन्नत की सफर

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर फिरताना काश्मिरचा फिल येतो. जाणून घेवूया कोणते आहे हे ठिकाण.

Mar 05, 2024, 23:54 PM IST

venna lake mahabaleshwar  : काश्मिर म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवन. दल सरोवर अर्थात दल लेक काश्मिरच्या सौंदर्यात भर घालते. दल लेकमध्ये शिकारा राईड हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण.  महाराष्ट्रातही असेच एक पर्यटनस्थल आहे जिथे फिरताना   काश्मीरचा फिल येतो. येथे नौका विहार म्हणजे जन्नत की सफर.

 

1/7

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे मिनी काश्मिर म्हणून देखील ओळखले जाते. 

2/7

नौका विहार करत असताना सूर्योदय पाहणे म्हणजे पर्यटकांसाठी अत्यंत विलक्षण अनुभव असतो.   

3/7

 वेण्णा लेक मध्ये पर्यटक नौका विहाराचा आनंद लुटतात. तसेच तलावा किनारी घोडेसवारी देखील करतात.

4/7

1842 मध्ये साताऱ्याचे राजे श्री अप्पासाहेब महाराज यांनी तलाव बांधला होता.   

5/7

  वेण्णा लेक हे महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.   

6/7

वेण्णा लेक, केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, लॉडवीक पॉईंट, सनसेट पॉईंट ही महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. 

7/7

सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेले महाबळेश्वर हे अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील निसर्ग सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालते.