'ही' आहेत भारतातील सर्वाधिक उंचीची शिवलिंग; भव्य रुप पाहून भारावून जाल

Mahashivratri 2025 : कुठे आहेत भारतातील सर्वाधिक उंचीची 7 शिवलिंग? महाशिवरात्रीच्या पर्वाआधी पाहा संपूर्ण यादी... 

Feb 19, 2025, 11:17 AM IST

Mahashivratri 2025 : देवादिदेव महादेवाची आराधना देशाच्या प्रत्येक राज्यात केली जाते. किंबहुना देशात अशी कैक शिवमंदिरं आहेत जी त्यांच्या स्थापत्यासमवेत त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणासाठी ओळखली जातात. 

 

1/8

महेश्वरम श्री शिव पार्वती मंदिर, केरळ

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं तिरुवअनंतपूरममधील चेंकल इथं महेश्वरम श्री शिव पार्वती मंदिरातील शिवलिंगाची उंची 111.2 फूट असल्याची नोंद केली होती.     

2/8

अमरनाथ गुंफा मंदिर, जम्मू काश्मीर

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या अमरनाथ गुफा मंदिर इथं दरवर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान 3888 मीटर उंचीचं बर्फाचं शिवलिंग तयार होतं. जुलै-ऑगस्टदरम्यान ही यात्रा सुरू राहते.   

3/8

हरिहर धाम मंदिर, झारखंड

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

झारखंडमधील या मंदिरात 65 फूट उंचीचं शिवलिंग आहे. या मंदिरात येणारा प्रत्येकजण भारावून जातो.   

4/8

बृहदेश्वर मंदिर, तमिळनाडू

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

तामिळनाडूतील तंजावर शहरात बृहदेश्वर मंदिर असून, भारतातील सर्वात मोठं मंदिर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. इथं असणाऱ्या शिवलिंगाची उंची आहे 13.5 फूट.   

5/8

अमरेश्वर महादेव मंदिर, मध्य प्रदेश

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

मध्य प्रदेशातील अनुपपूर इथं असणाऱ्या अमरेश्वर शिवमंदिरात 11 फूट उंच शिवलिंग आहे. हे ठिकाण नर्मदा नदीचं उगमस्थान आहे.   

6/8

सिद्धेश्वर नाथ मंदिर, अरुणाचल प्रदेश

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

अरुणाचल प्रदेशातील जीरो शहरात असणाऱ्या शिवलिंगाची उंची 25 फूट आणि रुंदी 22 फूट इतकी आहे.   

7/8

कोटिलिंगेश्वर मंदिर, कर्नाटक

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिरात 108 फूट उंचीचं शिवलिंग आहे. या शिवलिंगासमोर 35 फूट उंच नंदीसुद्धा आहे.   

8/8

भोजेश्वर मंदिर, मध्य प्रदेश

mahashivratri 2025 Biggest Shivling in india

भोजपूरचं भोजेश्वर मंदिर देशातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक असून, तिथं असणारं शिवलिंग 18 फूट उंच आहे. असं म्हणतात की 1 व्या शकतात परमार राजा भोज यानं हे मंदिर उभारलं.