शेजाऱ्यांमुळे महाराष्ट्रात येणार पूर? 5 फुटांच्या 'त्या' बांधकामाने 2 जिल्हे, शेकडो गावं पाण्यात?

Explained Floods In Maharashtra: महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भविष्यामध्ये अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. यामागील मुख्य कारण ठरणार आहे कर्नाटक सरकारचा एक निर्णय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 11, 2025, 10:23 AM IST
1/11

almattidam

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातील एका धरणाची उंची वाढवल्याने राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. अवघ्या 5 फुटांच्या या बंधकामाचा महाराष्ट्रातील पुराशी काय आणि कसं कनेक्शन आहे पाहूयात...

2/11

almattidam

कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवायला एका प्रकारे कर्नाटक सरकारला हिरवा कंदील मिळालाय. मात्र यामुळं सांगली, सातारा कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरली आहे.   

3/11

almattidam

मात्र या निर्णयामुळे सांगली, कोल्हापुरात महापुराचं चित्र भविष्यात अजूनही भयानक दिसू शकतं. कारण कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. धक्कादायक म्हणजे याला कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आणि केंद्रीय मंत्र्यांनी दिलीय. म्हणजेच राज्य सरकारनं अलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध केला नाही. 

4/11

almattidam

याबाबत समिती स्थापन करण्याची गरज नाही असं थेट जल लवादाने सांगून टाकलंय. जल लवादाची ही भूमिका म्हणजे कर्नाटक सरकारला आलमट्टीची उंची वाढविण्याच्या भूमिकेला हिरवा कंदील दिल्यासारखं आहे. पण कर्नाटकमधल्या या धरणाची उंची आणि सांगलीच्या पुराचं काय कनेक्शन आहेत पाहूयात इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...

5/11

almattidam

पलूसपर्यंत येतं बॅकवॉटर

6/11

almattidam

नरसोबावाडीपर्यंत फुगवटा

7/11

almattidam

महाराष्ट्राला अशाप्रकारे तीनदा बसलाय फटका

8/11

almattidam

कोल्हापूर, सांगलीला बसणार पुराचा फटका

9/11

almattidam

कराडपर्यंत फटका बसण्याची शक्यता

10/11

almattidam

पाच मीटरने वाढवणार धरणाची उंची

11/11

almattidam

कोल्हापूरमध्ये अनेक गावं पाण्याखाली जाण्याची शक्यता