डोंगराएवढं कर्ज, स्वप्नांची राखरांगोळी; अनिल अंबानी यांच्या पडत्या काळात पत्नीवर खरंच आलेली दागिने विकायची वेळ?

Tina Ambani: बॉलिवूड अभिनेत्री ते अंबानी कुटुंबाची सून, असा प्रवास करणाऱ्या टीना अंबानी कायमच कॅमेराची नजर वळवताना दिसतात.   

Sayali Patil | Feb 11, 2025, 09:55 AM IST

Tina Ambani: अनिल अंबानी यांच्या पडत्या काळात पत्नी, टीना अंबानी यांनी कशी दिलेली साथ? पाहा कधीकाळी पैशांची चणचण असणाऱ्या नीता अंबानी कशा झाल्या कोट्यवधींच्या मालकीण... 

 

1/7

श्रीमंत कुटुंब

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

Tina Ambani and Anil Ambani Love Story: भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून गणलं गेलेलं अंबानी कुटुंब आणि या कुटुंबातील प्रत्येक सदस्याविषयी सर्वांच्याच मनात कमाल कुतूहल पाहायला मिळतं. अशा या कुटुंबाचं बॉलिवूडशी खास नातं असलं तरीही याच बॉलिवूडमधील अभिनेत्री आपल्या कुटुंबाची सून व्हावी असं मात्र खुद्द धीरुभाई किंवा कोकिलाबेन अंबानी यांनाही वाटत नव्हतं. 

2/7

नियती

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करून अखेर अनिल अंबानी आणि टीना यांची लग्नगाठ बांधली गेली. लग्नानंतर टीना यांनी त्यांच्या कलाक्षेत्रातील कारकिर्दीला पूर्णविराम देत कुटुंबाला प्राधान्य दिलं. अंबानी कुटुंबातील सर्व संस्कार त्यांनी आत्मसात केले. 

3/7

आव्हानांच्या वेळीसुद्धा सोबत

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

फक्त आनंदाच्याच प्रसंगी नाही, तर अनेक आव्हानांच्या वेळीसुद्धा टीना यांनी अनिल अंबानींची साथ दिली. व्यवसाय असो किंवा एखादा कौटुंबीक निर्णय असो, टीना कायमच अनिल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. एक वेळ अशीही आली जेव्हा जगात श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानी असणाऱ्या अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली, ते आर्थिक संकटांमध्ये सापडले. पण, तेव्हाही पत्नीनं त्यांना साथ दिली. 

4/7

रिलायन्स

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

रिलायन्स समुहाच्या वाटणीनंतर 42 अब्ज डॉलरची संपत्ती अनिल अंबानींच्या वाट्याला आली. त्यांनी नवी झेप घेत नव्या कंपन्या सुरू केल्या. पण, चुकीच्या आखणीमुळं आणि निर्णयांमुळं त्यांना तोटाच जास्त झाला. टेलिकॉम, पावर, इन्फ्रास्ट्रक्चर , मनोरंजन सेक्टर अशा एकाहून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी फार कमी वेळात झेप घेतली. पण, हा निर्णय चुकला. 

5/7

अधिक खर्च

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

अपेक्षेहून अधिक खर्च, चुकीचे निर्णय, किमान परतावा या समीकरणांमुळं त्यांचं कर्ज वाढत गेलं आणि हा आकडा 25 हजार कोटींवर पोहोचला. दिवाळखोरीच्या मार्गावर असतानाच त्यांनी चीनी बँकांकडून कर्ज घेतलं. कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यानं पुढे त्यांना लंडन कोर्टात हजर करण्यात आलं जिथं त्यांना 5446 कोटी रुपये फेडण्याचे निर्देश देण्यात आले. 

6/7

हतबलता

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

न्यायालयापुढे अंबानी यांनी आपली हतबलता मांडत माझ्या खर्चासाठी पत्नी आणि मुलं पैसे पुढे करत असून, वकिलांच्याम मानधनाचा खर्च आपण पत्नीचे दागिने विकून करत असल्याचं त्यांनी न्यायालयापुढे सांगितलं. असं म्हटलं जातं की टीना अंबानींचे 9.9 कोटी किमतीचे दागिने यामध्ये विकण्यात आले होते.   

7/7

पत्नीची साथ

Tina Ambani Birthday love story with Anil Ambani chalanging period of relationship

पत्नीची साथ मिळाली, काळ आणि दिवस बदलले अन् अनिल अंबानी यांचं कर्ज कमी होत गेलं. आजच्या घडीला याच अंबानींची पत्नी, टीना यांच्याकडे तब्बल 5000 कोटी रुपयांची संपत्ती असून 17 मजली घर असल्याचं सांगितलं जातं. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाची सर्व धुरा त्यांच्या खांद्यांवर असून, लक्झरी कार ते अगदी 300 कोटींच्या खासगी विमानाची मालकीसुद्धा त्यांच्याकडे आहे असं म्हटलं जातं.