Fast Weight Loss Exercises: जिमला कायमचं म्हणा 'बाय-बाय', अवघ्या काहीच दिवसात होईल पोटाचा घेर कमी

Fast Weight Loss Exercises: आजकाल प्रत्येकजण वाढलेल्या वजनामुळे हैराण आहे. तंदुरुस्त आणि शरीर निरोगी असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. 

| Aug 05, 2023, 14:31 PM IST
1/5

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज किमान 30 मिनिटे नियमित चालले पाहिजे. वजन कमी करण्याचा सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणं. जर तुम्ही दररोज एक तास चाललात तर तुमच्या 300 कॅलरीज बर्न होतील.

2/5

वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी धावणे आणि जॉगिंगपेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांच्यासाठी जॉगिंग सर्वोत्तम मानले जाते. 

3/5

दोरीउड्या मारल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जलद बर्न होतात. जर तुम्ही फक्त 15 मिनिटे दोरीच्या उड्या मारल्या तर तुम्ही 300 कॅलरीज बर्न करू शकता. 

4/5

वजन कमी करण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. वजन कमी करण्यासाठी सायकल चालवणे खूप चांगले आहे. यामुळे शरीरातील चयापचय वाढतो आणि कॅलरीज वेगाने बर्न होतात. 

5/5

वजन कमी करण्याचा हा एक मार्ग म्हणजे स्विमिंग. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एक तास पोहल्याने शरीरातील 400 कॅलरीज बर्न होतात.