रुपेरी पडद्यावर गाजली खराखुरा हिरो असणाऱ्या 'बापा'ची कहाणी
कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते.
मु्ंबई : आजच्या युगात 'डे'ज साजरा करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक 'डे' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येत्या १६ तारखेला 'फादर्स डे' आहे. पण कित्येकांना याची कल्पना देखील नसेल. नेहमी आई बद्दल अनेक लेख, कविता वाचायला मिळतात. पण वडिलांबद्दल फार क्वचितच असं होतं. संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेणाऱ्या बापाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते. त्यामुळे लेख आणि कवितांच्या शीर्षकाची जागा वडिलांना घेता आली नाही.
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या माध्यमातून वडिलांच्या प्रेमाला प्रकाशझोतामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, आणि तो यशस्वी सुद्धा ठरला. रूपेरी पडद्यावरील बाप-लेक, बाप-बेटा यांच्या नात्यातील ती प्रेमाची नाळ अगदी मनाला स्पर्श करून जाते. अशा या प्रेमळ नात्यावर साकारण्यात आलेले काही चित्रपट...