FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
FIFA World Cup 2022 : यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना काल (रविवार, 18 डिसेंबर) पार पडला. जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे, कारण लिओनेल मेस्सीचं फुटबॉल वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न फक्त एक पाऊल दूर आहे. अर्जेंटिनाने फायनल सामन्यात फ्रान्सचा (FIFA WorldCup 2022) पराभव करत थरारक विजय मिळवला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा ( Argentina) विजय झाला पण फ्रान्सनेही (France) तितकीच कडवी झुंज दिली. या सामन्यानंतर सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू कोण आहे? यानिमित्ताने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम 5 फुटबॉलपटूंवर एक नजर टाकूया...