FIFA World Cup Final : अर्जेंटीना टीमची चिंता वाढली; Lionel Messi फायनल खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

Lionel Messi Injured Before Final : 2022 फिफा वर्ल्ड कप फायनलला (FIFA World Cup 2022 Final) आता फक्त 2 दिवस उरले आहेत. फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच मेस्सीच्या चाहत्यांना एका मोठा धक्का बसला आहे. 

Dec 16, 2022, 22:46 PM IST
1/5

अंतिम सामन्याआधी अर्जेंटिनापुढे काही अडचणी निर्माण झाली आहे. टीमचा चा कर्णधार आणि आघाडीचा खेळाडू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi ) दुखापतग्रस्त झाला आहे.

2/5

क्रोएशियाविरोधातील सामन्यातच मेस्सी (lionel messi) हॅमस्ट्रिंगचा त्रास झाल्याचं समोर आलंय.

3/5

गुरुवारी संपूर्ण संघ सराव करत असताना मेस्सी सरावामध्ये कुठेच दिसला नाही. 

4/5

मेस्सीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचं उघड झालं असून तो अंतिम सामना खेळणार की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. 

5/5

लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे, त्यामुळे अंतिम सामना त्याने खेळून वर्ल्डकप जिंकावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.