ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल लाखोंचा गंडा

Online Shopping Scam: तुम्हाला कोणता संशयित मेसेज आला असेल ज्यामध्ये तुम्हाला खूप काही ऑफर्स दिल्या असतील तर त्याबद्दल काळजी घ्या. तुमचे खाते रिकामे करण्यासाठी अशा फॉरवर्ड केलेल्या लिंक्स पुरेशा आहेत. अशा मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. ज्यावर क्लिक केल्यावर ते तुम्हाला फेक पेजवर घेऊन जाते. मग तुम्ही स्कॅमरच्या सापळ्यात अडकता आणि पेमेंट करता आणि तुमची फसवणूक होते.

| Oct 08, 2023, 09:46 AM IST

Online Shopping Scam: अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांकडून बंपर ऑफर सुरु आहे. लोक या विक्रीची आतुरतेने वाट पाहत होते. कारण या काळात अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. आता विक्री सुरू होताच ऑनलाइन घोटाळा सुरू होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाइन खरेदी दरम्यान स्कॅमर सर्वात जास्त सक्रिय असतात. ते लोकांना फसवतात आणि नंतर त्यांचे सर्व पैसे चोरतात. कोणत्याही सेल दरम्यान ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे असते.

1/8

ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल लाखोंचा गंडा

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Dont Share Otp Debit Card Details

Online Shopping Scam: अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांकडून बंपर ऑफर सुरु आहे. लोक या विक्रीची आतुरतेने वाट पाहत होते. कारण या काळात अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. आता विक्री सुरू होताच ऑनलाइन घोटाळा सुरू होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.

2/8

स्कॅमर सर्वात जास्त सक्रिय

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Dont Share Otp Debit Card Details

ऑनलाइन खरेदी दरम्यान स्कॅमर सर्वात जास्त सक्रिय असतात. ते लोकांना फसवतात आणि नंतर त्यांचे सर्व पैसे चोरतात. कोणत्याही सेल दरम्यान ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे असते.

3/8

खाते रिकामे होईल

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Dont Share Otp Debit Card Details

जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला असेल ज्यामध्ये तुम्हाला खूप काही ऑफर्स दिल्या असतील तर त्याबद्दल काळजी घ्या. तुमचे खाते रिकामे करण्यासाठी अशा फॉरवर्ड केलेल्या लिंक्स पुरेशा आहेत.

4/8

संशयित लिंक

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Dont Share Otp Debit Card Details

अशा मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. ज्यावर क्लिक केल्यावर ते तुम्हाला फेक पेजवर घेऊन जाते. मग तुम्ही स्कॅमरच्या सापळ्यात अडकता आणि पेमेंट करता आणि तुमची फसवणूक होते.

5/8

ऑनलाइन खरेदी

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Dont Share Otp Debit Card Details

जर तुम्ही एखादे उत्पादन ऑनलाइन खरेदी केले असेल आणि पेमेंट करणार असाल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.

6/8

ऑर्डर तपशील तपासा

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Dont Share Otp Debit Card Details

ऑनलाइन पेमेंट करताना, ऑर्डर तपशील व्यवस्थित तपासा. तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या उत्पादनाचे रिव्ह्यू काळजीपूर्वक वाचा. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. अनेक वेळा बनावट उत्पादनेही लोकांपर्यंत पोहोचवली जातात.

7/8

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Keep these things in mind while shopping online

जर तुम्ही पेमेंटसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला तुमच्या कार्डचे तपशील सेव्ह होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. अनेक वेळा तुम्हाला कार्ड तपशील सेव्ह करण्यास सांगितले जाते पण तसे करु नका. यामुळे तुमच्या कार्डचा तपशील चोरीला जाऊ शकतो.

8/8

OTP देऊ नका

Flipkart Amazon Online Shopping beware from Scammers Fraud Keep these things in mind while shopping online

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करता तेव्हा नेहमी अधिकृत वेबसाइटवर जा. जास्त हव्यास ठेवून थर्ड पार्टी अॅपवर क्लिक करु नका. तसेच कोणी पेमेंटसाठी OTP मागत असेल तर त्याला OTP देऊ नका.