Cricket World Cup : वर्ल्ड कपमध्ये 'या' बाप लेकाच्या जोडीने गाजवलाय इतिहास; नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

ICC ODI World CUP : बास डी लीडेचे वडील टिम डी लीडे हे एकदिवसीय विश्वचषक खेळणारी सातवी पिता-पुत्र जोडी ठरली आहे.

Oct 07, 2023, 20:18 PM IST

Father son duo in World Cup : वर्ल्ड कपमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. बास डी लीडेचे वडील नेदरलँड्सकडून विश्वचषकही खेळले आहेत. म्हणजेच बास डी लीडेचे वडील टिम डी लीडे हे एकदिवसीय विश्वचषक खेळणारी सातवी पिता-पुत्र जोडी ठरली आहे.

1/7

डी लीडे

बास डी लीडे नुकताच चर्चेत होता तो आपल्या वडिलांच्या म्हणजेच टिम डी लीडे यांच्या अॅक्शन साईनमुळे... दोघांनी नेदरलँडसाठी वर्ल्ड कप खेळला आहे. 

2/7

करन

इंग्लंड संघाचा स्टार ऑलराऊंडर सॅम करन याच्या वडिलांनी म्हणजेच केविन करन यांनी देखील वर्ल्ड कपमध्ये जिम्बाब्वेसाठी मोलाची कामगिरी केलीये.

3/7

लॅथम

सध्या केन विलयम्सनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची खिंड लढवणाऱ्या टॉम लॅथम याचे वडील रॉड लॅथम यांनी देखील न्यूझीलंडसाठी वर्ल्ड कप खेळलाय.  

4/7

ऑस्ट्रेलियाचे माजी स्टार फलंदाज ज्योफ मार्श यांच्या मुलांनी म्हणजेच मिशेल मार्श, शॉन मार्श यांनी देखील वर्ल्ड कप खेळला आहे.  

5/7

ब्रॉड

इंग्लंडचा स्टार बॉलर स्टुअर्ट ब्रॉड याचे वडील क्रिस ब्रॉड यांनी देखील इंग्लंडसाठी वर्ल्ड कप खेळला आहे.

6/7

केर्न्स

लांस केर्न्स यांनी न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप खेळला होता. तर त्याचा मुलगा क्रिस केर्न्स याने न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप खेळलाय.

7/7

प्रिंगल

डॉन प्रिंगल यांनी इस्ट आफ्रिकेकडून वर्ल्ड कप खेळला होता. तर त्याचा मुलगा डेरेक प्रिंगल याने इंग्लंडकडून वर्ल्ड कप खेळलाय.