Mpox Preventions: या' गोष्टी पाळा आणि मंकीपॉक्स टाळा, महामारीपासून रहा सुरक्षित
Monkeypox Precautions: जगात आता सर्वत्र मंकीपॉक्सचा धोका संभवतोय. अशात मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे जो मंकीपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. हा ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील एक प्रजाती. सर्व प्रथम 1958 साली संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये मंकीपॉक्स आढळून आला होता. याचा पहिला रूग्ण एक 9 महिन्याचा मुलगा होता. मंकीपॉक्सचे जगभरातील थैमान आणि WHO ने दिलेले इशारा लक्षात घेता मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया काय केल्याने तुम्ही मंकीपॉक्सपासून सुरक्षित राहू शकतात.