अभिनेते ऋषी कपूर यांचा जीवन प्रवास

| Apr 30, 2020, 19:57 PM IST
1/5

कुटुंब

कुटुंब

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ ला मुंबईतील चेंबूर येथे झाला. ऋषी कपूर बॉलिवूडचे शो मॅन म्हणजेच राज कपूर यांचे चिरंजीव आहेत. ऋषी कपूर यांना प्रेमाने चिंटू बोललं जायचं. रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे दोन ऋषी कपूर यांचे भाऊ आहेत.

2/5

शिक्षण

शिक्षण

ऋषी कपूर यांनी आपल्या भावांसोबत सुरुवातीचं शिक्षण घेतलं. मुंबईतील कँपियन स्कूलमध्ये त्यांनी सुरुवातीच शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील मेयो कॉलेजंमध्ये प्रवेश घेतला. पण अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी पूर्ण शिक्षण नाही घेतलं.

3/5

विवाह

विवाह

ऋषी कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांना ५ वर्ष डेट केल्यानंतर त्यांच्यासोबत विवाह केला. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रणबीर कपूर आणि रिधिमा कपूर. रिधिमाचा विवाह बिझनेस मॅन भारत साहनी यांच्यासोबत झाला आहे. बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर ऋषी कपूर यांची पुतणी आहे.

4/5

सिनेमात करिअर

सिनेमात करिअर

कुटुंब आधीपासूनच सिनेमाचा जगतात असल्याने ऋषी कपूर देखील आपोआप या क्षेत्रात आले. त्यांना लहानपणापासूनच याची आवड होती. 1970 मध्ये मेरा नाम जोकर मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. ऋषी कपूर यांनी आपल्या वडिलांच्या लहानपणाचा रोल केला होता. पण एक मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी 1973 मध्ये रिलीज बॉबी सिनेमातून एन्ट्री केली होती. या सिनेमात लीड रोलमध्ये त्यांच्यासोबत डिंपल कपाड़िया होत्या. जिंदा दिल, बारूद, कभी-कभी, अमर अकबर एंथोंनी, नगिना, सिंदूर या सह अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. `द बॉडी` सिनेमात त्यांनी शेवटची भूमिका केली आहे.

5/5

सन्मान

सन्मान

ऋषी कपूर यांना त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयामुळे अनेक अॅवॉर्ड मिळाले आहेत. अॅवार्ड  लिस्टमध्ये फिल्म फेयर अवार्ड, फिल्म फेयर लाईफटाईम अचीवमेंट अॅवार्ड, स्क्रीन लाइफटाईफ अचीवमेंट अवार्ड, स्क्रीन अॅवॉर्ड, झी सिने अॅवॉर्ड सह अनेक मोठे अॅवॉर्ड मिळाले आहेत.