Fruit Leaves: 'या' फळांची पाने आरोग्यासाठी वरदान, आजारांवर रामबाण उपाय

Fruit Leaves Health Benefits: फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण फळांच्या पानांमध्ये देखील तितकेच औषधी गुणधर्म असतात.  जीवघेणे आजार दूर करण्याचे काम करतात. अनेक फळांच्या पानांच्या सेवनाने मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि डेंग्यूसारखे घातक आजार बरे होतात. चला जाणून घेऊया कोणत्या फळांची पाने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Dec 25, 2022, 18:58 PM IST
1/5

Fruit Leaves

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांसाठी आंब्याची पाने फायदेशीर असतात. ही पाने चघळल्याने लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते. आंब्याची पाने त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहेत.

2/5

Fruit Leaves

पेरूच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पेरूची पाने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, रक्तदाब आणि पचन यांसारख्या समस्या दूर करण्याचे काम करतात. पानाच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते.

3/5

Fruit Leaves

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाची पाने वरदान आहेत. जांभळाच्या हिरव्या पानांचे सेवन साखरेवर नियंत्रण ठेवतात. ही पाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर करण्यास मदत करतात.

4/5

Fruit Leaves

पपईच्या पानांमध्ये पोषक तत्वांचा साठा दडलेला असतो. डेंग्यूसारख्या गंभीर आजारात पपईच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. पपईची पाने साखर आणि पचनासाठी देखील फायदेशीर आहेत.

5/5

Fruit Leaves

पीचच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ही पाने कोलेस्ट्रॉल आणि साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पीचची पाने त्वचेसाठीही फायदेशीर असतात.