रोजच्या वापरातल्या Password ला मराठीत काय म्हणतात?

दैनंदिन कामकाजात आपण असे अनेक शब्द वापरतो ज्याचे मराठी अर्थ आपल्याला माहित नसतात. मराठी आपली मातृभाषा असतानाही आपण मराठीत बोलताना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो. आपल्या रोजच्या वापरताला असाच एक शब्द म्हणजे Password. मोबाईलपासून, ई-मेल आणि लॅपटॉपसाठी आपण पासवर्डचा वापर करतो. पण याचा मराठी अर्थ तुम्हाला माहित आहे का?

| Sep 17, 2024, 19:16 PM IST
1/8

रोजच्या वापरातल्या Password ला मराठीत काय म्हणतात?

2/8

मोबाईल असो की ई-मेल किंवा लॅपटॉप असो आपली खासगी माहिती गुप्त ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवतो. पण पासवर्ड हा एक इंग्रजी शब्द आहे. आपल्या बोली भाषेत मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शब्दांचा वापर होतो.

3/8

सध्याच्या युगात जवळपास सर्वांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलमध्ये आपल्या अनेक खासगी गोष्टी असतात. फोटो, मोबाईल बँकिंग, खासगी नंबर. चुकून हा मोबाईल कोणाच्या हातात पडला तर आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे बरेच जण मोबाईलला पासवर्ड ठेवतात.

4/8

मोबाईलप्रमाणेच आपल्या खासगी लॅपटॉपमध्येही बरीच माहिती स्टोर केलेली असते. त्यामुळे मोबाईलप्रमाणेच आपण लॅपटॉपलाही पासवर्ड ठेवतो. इतकंच काय तर ई-मेल उघडण्यासाठी आपल्याला पासवर्डची गरज भासते.

5/8

पासवर्ड जितका स्ट्राँग ठेवाल तितकी सुरक्षा जास्त. आपण पासवर्ड दिल्याशिवाय आपला मोबाईल किंवा लॅपटॉप कोणीही उघडू शकत नाही. म्हणजे हा पासवर्ड आपल्या स्मार्टफोनसाठी एक प्रकारे आपल्या वैयक्तिक पहारेकऱ्याचे काम करतो.

6/8

हल्लीच्या काळात आपल्या मोबाईलमध्येच बँकिंग सुविधाही असते. त्यामुळे स्मार्टफोनवर आपल्या खात्याची माहिती पाहाण्यासाठी किंवा गुगल पे वापरण्यासाठी पासवर्ड महत्त्वाचा ठरतो.

7/8

एकूणच पासवर्ड हा शब्द आपल्या रोजच्या वापरतला एक महत्वाचा शब्द आहे. आपल्या ऑनलाईन सेवेला सुरक्षा पुरवणरा पासवर्ड डिजिटल जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

8/8

पासवर्ड हा शब्द इंग्रजी आहे. तुम्हाला माहित आहे का पासवर्डला मराठीत काय म्हणतात? पासवर्डचा मराठी अर्थ आहे 'सांकेतिक शब्द'