काळा इतिहास: सैफआधी मुंबईत 'या' कलाकारांवर हल्ला; 500 कोटी कमवणाऱ्या सेलिब्रेटीला संपवलं

List of Bollywood Celebrities Attacked In Mumbai: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या बातमीमुळे मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र यापूर्वीही मायानगरी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करण्यात आलं आहे. हे सेलिब्रिटी कोण ते जाणून घेऊयात...

| Jan 17, 2025, 15:06 PM IST
1/13

saifattacked

मुंबईला बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्ले होण्याचा काळा इतिहास आहे हे नाकारता येणार नाही. मागील काही वर्षांमध्ये पुन्हा हे प्रकार दिसून येत आहेत. आतापर्यंत कोणकोणत्या बॉलिवूड कलाकारांना धमकावण्यात आलं? कोणाची हत्या करण्यात आली? कोणावर गोळीबार करण्यात आला? जाणून घेऊयात. यादीतील शेवटचं नाव पाहून व्हाल थक्क...

2/13

saifattacked

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात शिरलेल्या एका चोराने प्राणघातक हल्ला केल्याने पुन्हा एकदा मायनागरी मुंबई कलाकारांना मिळालेल्या धमक्या आणि झालेले हल्ले चर्चेत आहेत. आतापर्यंत कोणाकोणाला याचा सामना करावा लागला आहे पाहूयात. आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या घडीला 10 हजार कोटींची संपत्ती असलेल्या कुटुंबातील एका सदस्याची मुंबईतच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यापूर्वी कोणाकोणाला, कधी आणि कसं टार्गेट करण्यात आलंय पाहूयात...

3/13

saifattacked

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला वारंवार धमक्या दिल्या जातात.

4/13

saifattacked

2024 मध्ये सलमानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून गोळीबार करण्यात आला.

5/13

saifattacked

सलमानला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

6/13

saifattacked

2000 साली सांताक्रुझ येथे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते राकेस रोशन यांच्यावर गोळीबार झालेला.  

7/13

saifattacked

राकेश रोशन यामधून थोडक्यात बचावले होते.

8/13

saifattacked

2001 साली अभिनेत्री प्रिती झिंटाला धमकावण्यात आल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडालेली.  

9/13

saifattacked

प्रिती झिंटाकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली होती

10/13

saifattacked

1990 च्या दशकात शाहरुख खानला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमकडून वारंवर धमक्या दिल्या जायच्या.  

11/13

saifattacked

2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने शाहरुखला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे.  

12/13

saifattacked

शाहरुखला अजूनही धमक्या दिल्या जातात असं वेळोवेळी दिसून येतं.  

13/13

saifattacked

1997 साली वर्षाला 500 कोटी रुपये कमवणाऱ्या गुलशन कुमार यांची मुंबईतील अंधेरीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांची कंपनी त्यांचा मुलगा भुषण कुमारने पुढे सुरु ठेवली असून या कुटुंबाची एकूण संपत्ती आज 10 हजार कोटींच्या आसपास आहे.