सोनं-चांदीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड; ज्वेलर्सकडे जाण्याआधी माहिती करुन घ्या!

ज्वेलर्सकडे जाण्याआधी सोन्या-चांदीचे वाढलेले दर तुम्हाला माहिती असायला हवेत.

Pravin Dabholkar | Feb 20, 2025, 20:32 PM IST

Gold and silver Rates: ज्वेलर्सकडे जाण्याआधी सोन्या-चांदीचे वाढलेले दर तुम्हाला माहिती असायला हवेत.

1/8

सोन्या-चांदीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड;सोनाराकडे जाण्याआधी माहिती करुन घ्या!

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

Gold and silver Rates: सोने-चांदी हा सर्वांच्याच जवळचा विषय असतो. लग्न ते मुंजपर्यंतचे घरचे कार्यक्रम, सणासुदीला, शुभ दिनी सर्वजण थोडं का होईना, सोनं विकत घेतात. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढल्यास त्याचा परिणाम ग्राहकांवर होतो. ज्वेलर्सकडे जाण्याआधी सोन्या-चांदीचे वाढलेले दर तुम्हाला माहिती असायला हवेत.

2/8

प्रतिकिलो दर

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

सोन्या-चांदीने आतापर्यंतचे सर्वाधिक दर गाठले आहेत. सोने हे 90 हजाराच्या उंबरठ्यावर तर चांदी एक लाख 2000 रुपये प्रतिकिलो दराने मिळतंय.

3/8

उच्चांकी दर

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

जागतिक ट्रेड वार चा परिणाम हा जळगावच्या सुवर्ण बाजारावर होत असून सोन्या चांदीने आतापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी दर गाठल्याचे पाहायला मिळत आहे.

4/8

आतापर्यंतची सर्वाधिक वाढ

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

आज सोन्याचे दर 89 हजार 700 रुपये प्रतितोले तर चांदीचे दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति किलो जीएसटी सह झाले आहेत. सोन्या चांदीच्या दरात ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ मानली जात आहे.

5/8

नव्वदी पार

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

येत्या काही दिवसात सोनं हे नव्वद हजार रुपये प्रति तोळा हे दर पार करतील अशी माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे.

6/8

किती महाग?

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

तब्बल पन्नास दिवसांमध्ये सोनं हे 15000 रुपयांनी महागले आहे तर चांदी 18000 रुपयांनी महाग झाली आहे.

7/8

सोन्याला मागणी वाढली

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

जागतिक ट्रेड वार आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टॅरीफ मुळे या सर्व घडामोडींचा परिणाम हा सुवर्ण बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर मंदीचे सावट असल्यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे.

8/8

बजेट कोलमडले

Gold and silver Rates have reached their highest ever prices Know Details

त्यामुळे सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे लग्नसराई सुरू असल्यामुळे आणि सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत.