महाष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी; भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याआधीच झाला उगम

 गोदावरी नदीला अध्यात्मिक इतिहास आहे.  जाणून घेऊया गोदावरी नदी विषयी.     

| May 15, 2024, 00:17 AM IST

Maharashtra Godavari River : गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. त्याचप्रमाणे गोदावरी नदी ही महाराष्ट्राची गंगा म्हणून ओखळली जाते. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.

1/7

गोदावरी ही महाष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदी ही दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखली जाते. 

2/7

नाशिकमधील गोदावरी पात्रात एकूण प्राचीन 17 कुंड आहेत. यापैकी रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहेत. 

3/7

गोदावरी नदीच्या काठावरच नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक स्नानासाठी येतात. म्हणूनच गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.  

4/7

महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहत आंध्रप्रदेश मध्ये राज्यात प्रवेश करते.

5/7

गंगा नदीनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब नदी गोदावरी आहे. 

6/7

भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याचा अगोदर गोदावरीचा उगम झाला अशी अख्यायिका आहे.

7/7

 पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे गोदावरी नदीचा उगम झाला.