'तुम्हाला काय वाटतं मी टॉयलेट धुणार,' गोविंदाच्या पत्नीने चार वेळा धुडकावली आहे बिग बॉसची ऑफर; 'शाहरुख खानची...'
Govinda Wife Sunita Rejected Bigg Boss: 1980-90 च्या दशकात गोविंदाची प्रसिद्धी इतकी होती की, अनेक सुपरस्टार्सना तो आव्हान देत होता. पण आता मात्र गोविंदा मोठ्या पदड्यावर फारसा दिसत नाही. पण काही ना काही कारणास्तव तो चर्चेत असतो. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने एका पॉडकास्टमध्ये आपण बिग बॉसची ऑफऱ नाकारली होती असा खुलासा केला होता. दरम्यान सध्या गोविंदाने चुकून आपल्याच पायावर गोळी झाडल्याने चर्चेत आहे.
Govinda Wife Sunita Rejected Bigg Boss: 1980-90 च्या दशकात गोविंदाची प्रसिद्धी इतकी होती की, अनेक सुपरस्टार्सना तो आव्हान देत होता. पण आता मात्र गोविंदा मोठ्या पदड्यावर फारसा दिसत नाही. पण काही ना काही कारणास्तव तो चर्चेत असतो. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने एका पॉडकास्टमध्ये आपण बिग बॉसची ऑफऱ नाकारली होती असा खुलासा केला होता. दरम्यान सध्या गोविंदाने चुकून आपल्याच पायावर गोळी झाडल्याने चर्चेत आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798015-govinda-wife-sunita.jpg)
Govinda Wife Sunita Rejected Bigg Boss: 1980-90 च्या दशकात गोविंदाची गणना सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये केली जात होती. त्यावेळी गोविंदा आपल्या अटींवर चित्रपट साईन करत असे. पण एक वेळ अशी आली जेव्हा गोविंदाचा स्टारडम कमी झाला आणि त्याला काम मिळणंही कठीण झालं. आता तर गोविंदा मोठ्या पडद्यावरुन जवळपास गायब झाला आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798013-govinda-wife-sunita1.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798011-govinda-wife-sunita2.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798010-govinda-wife-sunita3.jpg)
सुनिता अहुजाने सांगितलं की, "गेल्या 4 वर्षांपासून मला 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर येत आहेत. त्यांनी मला अनिल कपूरच्या ओटीटी शोचा भाग होण्यास सांगितलं. दोनदा तो माझ्याकडे या सीझनसाठी ऑफर घेऊन आले होते. पण मी त्यांना म्हटलं की, 'तुम्ही वेडे आहात का? मी शौचालय स्वच्छ करते असं तुम्हाला वाटतं का? तू मला हे विचारत आहेस, हाच प्रश्न शाहरुख खानच्या पत्नीला विचारण्याची हिंमत कराल का? माझ्याकडे पैसे नाहीत असं तुम्हाला वाटते का? मी 'बिग बॉस' पाहतही नाही:.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798009-govinda-wife-sunita4.jpg)
जेव्हा मी या शोची ऑफर मिळाल्यावर नाराजी व्यक्त केली आणि नाकारली, तेव्हा निर्मात्यांनी मुलगी टीनाला शोची ऑफर दिली असा दावा सुनिता अहुजाने केला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता म्हणाली की, जेव्हा गोविंदाला सलमान खानसोबत शो होस्ट करण्याची संधी मिळेल तेव्हाच ती बिग बॉस करेल. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा सुनीता अहुजाने नुकतीच व्यक्त केली होती.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798007-govinda-wife-sunita5.jpg)
'टाइम आऊट विथ अंकित' पॉडकास्टवर बोलताना सुनिता अहुजाने तिची इच्छा व्यक्त केली की, जर चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने तिला त्याच्या प्रसिद्ध शो 'कॉफी विथ करण'मध्ये आमंत्रित केले तर ती नक्कीच जाईल. आत्तापर्यंत त्यांना या शोचे निमंत्रण मिळाले नसले तरी याबाबत कोणतीही अडचण नाही. सुनिताने असंही सांगितलं की, आपल्या कार्यक्रमात कोणाला बोलवायचं ही करण जोहरची मर्जी असून, आपल्याला या गोष्टीचं काही वाईट वाटत नाही.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/01/798006-govinda-wife-sunita6.jpg)