HAPPY BIRTHDAY : जाणून घ्या कतरिनाचं खरं नाव आणि बरंच काही.....
'बूम' चित्रपटाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
मुंबई : ब्रिटिश नागरिकत्व असलेली कतरिना कैफ सध्याची आघाडाची बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म १९८३ साली हाँगककाँगमध्ये झाला होता. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षापासून तिने आपल्या मॉडेलींग करियरला सुरूवात केली होती. लंडनमध्ये तिने मॉडेलींग करियरला सुरूवात केली. २००३ मध्ये करिनाने तिच्या बॉलिवूड करियरला सुरवात केली. 'बूम' चित्रपटाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ५ जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाने कतरिनाच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली आहे. तर कतरिना वाढदिवसादिवशी जाणून घेवू तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...




