Ruturaj Gaikwad Birthday : “रॉकेट राजा” म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू, चाहत्यांच्या मनावर करतोय राज्य

“रॉकेट राजा” असं त्याचं टोपणनाव असून ऋतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या जबरदस्त शैलीमुळे ओळखला जातो.   

Jan 31, 2024, 13:52 PM IST
1/9

मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटच्या मैदानात ऋतुराजला एक खास टोपणनाव देण्यात आलं आहे.  

2/9

“रॉकेट राजा” असं त्याचं टोपणनाव असून ऋतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या जबरदस्त शैलीमुळे ओळखला जातो.   

3/9

ऋतुराजचा जन्म 31 जानेवारी 1997 रोजी पुण्यामध्ये झाला. गायकवाड याने 2021 मध्ये भारतीय पहिल्यांदा त्याच्या उत्तम खेळीच्या जोरावर आपलं नाणं खणखणीत वाजवलं.  

4/9

ऋतुराजच्या फलंदाजीची शैली पाहता त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी त्याला “रॉकेट राजा” हे टोपणनाव दिलं.  

5/9

बॅटिंगची त्याची आक्रमक शैली आणि क्रिकेटच्या मैदानात अधिराज्य गाजवण्याची क्षमतेमुळे त्याला हे टोपणनाव शोभतं.   

6/9

याशिवाय त्याच्या या टोपणनावाला एक मराठमोळी जोड देखील आहे. महाराष्ट्रातील गायकवाड घराऱ्याचा संदर्भ देत मराठ्याच्या राज्यात घराण्याचं महत्त्व पाहता, त्याच्या टोपणनावाच राजाचा उल्लेख केला जातो.

7/9

IPL मध्ये ऋतुराजच्या कामगिरीला तोड नाहीये. चेन्नई सुपर किंग्जचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.  

8/9

यशाच्या या लाटेवर गायकवाडने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि तब्बल 259 रन  केले.  

9/9

या क्रिकेटपटूने 3 जून 2023 रोजी त्याची दीर्घकालीन मैत्रीण उत्कर्षा पवारसोबत लग्न केले. उत्कर्षा ही महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज आहे.