सततच्या कामाने मान आखडली आहे का? मग 'हे' उपाय नक्कीच येतील कामी

9-10 तास ऑफिसमधे एकाच जागेवर बसून काम केल्याने मान आखडण्याची समस्या बऱ्याच जणांना जाणवते. अशावेळी काही सोप्या उपायांचा अवलंब करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता.

Aug 28, 2024, 20:24 PM IST

9-10 तास ऑफिसमधे एकाच जागेवर बसून काम केल्याने मान आखडण्याची समस्या बऱ्याच जणांना जाणवते. अशावेळी काही सोप्या उपायांचा अवलंब करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता.

 

1/6

सततच्या कामाने मान आखडली आहे का? मग 'हे' उपाय नक्कीच येतील कामी

2/6

मान आखडली की मानेची हलचाल करताना त्रास व्हायला लागतो. मान एकाच दिशेला अडकली आहे असं वाटतं. जास्त वेळ एकाच जागेवर बसल्यामुळे असा त्रास होतो. असं दुखणं सतत संगणक-भ्रमणध्वनी पाहिल्यानंतर ,लचक भरल्यामुळे, खेळताना कुठे लागल्यामुळे होऊ शकतं.

3/6

आराम करा

अभ्यासातून सिद्ध झालं आहे की, मासपेशींना आरामाची गरज असते. योग्य आराम घेतल्याने शरीर तरतरीत राहते. मान दुखत असल्यास जास्त हलचाल करु नये. आराम केल्याने दुखणं लवकर बरं होत.

4/6

गरम आणि गार शेक घ्या

मासपेशी मोकळ्या करण्यासाठी गरम आणि गार शेक घेणे फार उपायकारक आहे. गरम शेक घेण्यासाठी खास पिशवी आणि गार शेक घेण्यासाठी आइस बँग बाजारात मिळते. त्या पिशवीच्या मदतीने शेक घेतल्याने मान लवकर मोकळी होईल. जर सुज आली असेल तर शेक घेतल्याने ती कमी होते.

5/6

आल्याचा लेप

मानेचं आखडणं आणि दुखणं कमी करण्यासाठी आल्याचा लेप मानेला लावा आणि आल्याच्या चाटणाचे गरम पाण्यातुन सेवन करा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

6/6

टेनिसच्या चेंडूने मसाज करा

टेनिसच्या चेंडुने मानेवर वेगवेगळ्या प्रकारे मालीश करा.मान जिथे अडकली आहे तिथे चेंडूच्या सहाय्याने दाब द्या.असे केल्याने मानेला हळुहळु बरं वाटेलं. (Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)