दोन लाखांचं कर्ज काढून IPS ची वर्दी विकत घेतली, रोज गावभर फिरायचा; नंतर कळलं आपला गेम झाला!
इतके दिवस हा तरुण आय.पी.एस ऑफीसर बनून, रस्त्यांवरुन माजात फिरत होता. खऱ्या ऑफिसरांशी गाठभेठ झाल्यावर कळले की आपली चांगलीच फसवणूक झाली आहे.
बिहारमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. स्वतःला पोलीस समजणाऱ्या मुलाला, पोलिसांकडून तो अधिकारी नसल्याचे कळले. आणि ज्याला पोलीस आरोपी समजत होते तो खरा पिडीत निघाला. वाचा नक्की काय भानगड आहे.
1/7

2/7
बोगस अधिकारी

3/7
तोतया ऑफीसर

सध्या बिहारमध्ये हा तोतया आय.पी.एस ऑफीसर फार चर्चेत आहे. हा पठ्ठा अंगावर वर्दी, डोक्याला टोपी, कमरेला बंदुक अशा अवतारात, सिकंदर चौकातील लोकांच्या नजरेस पडला. चेहऱ्यावरुन मात्र किशोरवयीन वाटत होता. चौकातील काही लोकांना मामला गडबडीचा वाटला, म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले. नक्की गडबड काय आहे, ते जाणून घेण्यासाठी त्याला 'जमुई' येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
4/7
खरा प्रकार बनवेगिरीचा

ठाण्यात आल्यावर मात्र हा कावराबावरा झालेला युवक पोपटासारखा बोलू लागला. मुलाचे नाव 'मिथिलेश कुमार' असून तो गोवर्धन बीघा गावचा रहिवासी आहे. त्याला स्वतःला तो कोणताही ऑफिसर नाही, हे पोलिसांकडून कळले. तो स्वतःला आय.पी.एस समजून रोज गणवेश घालून, बंदुक घेऊन मोटरसायकलवर ऐटीत फिरायचा. चौकशीनंतर कळले की, सारा प्रकार 'बनवेगिरी'चा आहे. आणि मिथिलेश खरा आरोपी नसून फसव्या टोळीचा शिकार झाला आहे.
5/7
नक्की काय घडले?

6/7
कर्ज घेऊन पैसे जमावले
