आरोग्यासाठी लाभदायक पांढऱ्या भाज्या

आहारात करावा समावेश

Aug 31, 2020, 16:44 PM IST
1/5

फ्लॉवर

फ्लॉवर

शरीरास उपयुक्त असे अनेक पोषक घटक फ्लॉवरमध्ये असतात. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रोटीन, कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन्स, आयोडीन, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषकघटक असतात. इतके सारे पोषकघटक असल्याने त्यापासून मिळणारे फायदे देखील आरोग्यास लाभदायक असतात. 

2/5

मशरूम

मशरूम

मध्ये विटामिन डी देखील असते. हे व्हिटॉमिन्स हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने २० टक्के व्हिटॉमिन्स डीची कमतरता भरुन निघते. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.

3/5

बटाटा

बटाटा

 नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते. इतकेच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदयरोग दूर ठेवण्यासाठी मदत करतात.

4/5

कांदा

कांदा

कांदा कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरतो. कांदा अँटिऑक्सिडंट युक्त आहे. कांद्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे कँसरवर प्रतिबंधासाठी मदत होते. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

5/5

लसून

लसून

लसनामध्ये पौष्टीक तत्व जास्त असल्यामुळे, आपण अनेक रोगांपासून दूर राहतो.लसून खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी तसंच आयोडीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व मिळतात. रोज लसून खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहते.