International Men's Day : पुरुषांचा दिवस आणखी बनवा खास; 'आंतरराष्ट्रीय मेन्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा

आज जगभरात पुरुष दिवस साजरा केला जातो. पुरुषांच समाजात असलेलं स्थान आणि त्याचे महत्त्व ओळखून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जवळच्या पुरुषाचा दिवस करा आणखी खास. 

19 नोव्हेंबर रोजी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' म्हणून साजरा केला जातो. पुरुषांनी समाज, कुटुंबामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जवळच्या पुरुषांचा दिवस अतिशय खास बनवा. यासाठी साजरा करा हा दिवस त्यासाठी या खास मराठमोळ्या शुभेच्छा. 

1/7

''तुमचा दिवस आनंदाने, हास्याने आणि तुम्ही पात्र असलेल्या कौतुकाने भरला जावो. याच सदिच्छा'' आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

2/7

 ''या पुरुष दिनानिमित्त मी तुम्हाला यश, आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतो." आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

3/7

"पुरुष हा देवाच्या सर्वात सुंदर निर्मितींपैकी एक आहे'' आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

4/7

कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, सर्व गोष्टींचा त्याग करण्यासाठी, सर्वांसोबत कायम उभे राहण्यासाठी धन्यवाद! पुरुष दिनाच्या शुभेच्छा!  

5/7

पुरुष त्याच्या पैशाने ओळखला जात नाही, तर त्याच्या चारित्र्याने आणि सचोटीने ओळखला जातो, सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

6/7

माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक पुरुषाला, पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.  

7/7

आम्हाला आधार असणाऱ्या, आम्हाला उंच उडण्यास मदत करणारे पंख असणाऱ्या, आयुष्यातील बाप, भाऊ, नवरा, मित्र अशा सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!