Mumbai Heatwave: मुंबईचा पारा वाढला, नागरिक उकाड्याने हैराण, रात्रीही अंगाची लाहीलाही
Heatwave in Mumbai: मुंबईत सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत.
Temperature in Mumbai: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना मुंबईत तापमानाचा पारा वाढलेला दिसून येत आहे. रात्रीही उकाड्याने मुंबईकर हैराण झाला आहे. पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा थेट तीन ते चार अंशांनी वाढली. मुंबईत सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांना दुपारी उन्हातून चालताना चांगल्याच घामटा निघाला. उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत.त्यामुळे पंख्याची हवा खाण्यासाठी तसेच एसीसीठी विजेची मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.



उष्णता वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे.तसेच दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर पडू नका.


