नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! मदतीसाठी भारतीय लष्कर उतरलं पाण्यात

शुक्रवारी मध्यरात्री नागपुरात पहिल्यांदाच ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं आहे. मुसळधार पावसामुळे नागनदीला पूर आला आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.

Sep 23, 2023, 13:33 PM IST
1/7

मोरभवन बस स्थानकात बस कर्मचाऱ्याचं रेस्क्यू

Rescue of bus worker at Morbhavan bus station

सीताबर्डी येथील मोरभवन बस स्थानकात अडकलेल्या बस चालक वाहकाचे रेस्क्यू करण्यात आले. सुमारे 10 ते 12 बस मोर भवनमध्ये पूर्णपणे पाण्याखाली अडकल्या आहेत.

2/7

लष्कराच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Rescue operation started in Nagpur with the help of army

लष्कराचे दोन पथक तसेच अग्निशमन विभागाच्या एका पथकाने घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे

3/7

झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंजकडे जाणारा भाग पाण्यात

nagpoor flood

झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज जाणाऱ्या मार्गावरून चक्क नदी प्रवाहीत होत असल्याचं चित्र सध्या नागपुरात पाहायला मिळत आहे.  

4/7

पाण्याखाली बुडाल्या कार

Cars submerged under water

नागपुरात पावसानं हाहाकार केला आहे. अनेक भागात पावसाच पाणी शिरल्याने वाहने पाण्याखाली गेली आहेत.  

5/7

नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

Holiday for schools in Nagpur district

नागपुरात मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडत आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.

6/7

रुग्णालयही पाण्याखाली

Hospital in Nagpur also under water

नागपुरातील शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिट पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे.

7/7

रेल्वेरुळही पाण्याखाली

Railway track in Nagpur also under water

नागपूर रेल्वेवरील रेल्वे रुळ प्लॅटफार्मपर्यंत पूर्णपणे भरून गेल्याने अनेक गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.