Ekadashi Horoscope : परिवर्तिनी एकादशीला 3 शुभ योग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Parivartini Ekadashi 2024 : भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी असून तिला परिवर्तिनी एकादशी किंवा भाद्रपद एकादशी असं म्हटलं जातं. भाद्रपद शुक्ल एकादशी तिथी 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 ते 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:41 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 14 सप्टेंबरला एकादशीचं व्रत करायचं आहे.
1/7

2/7

3/7
वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी एकादशीचा दिवस लाभदायक आहे. या लोकांना त्यांच्या घरगुती जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून हळूहळू आराम मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मकता येणार आहे. तुमचं एखादं काम दीर्घकाळ प्रलंबित असेल तर ते पूर्ण होणार आहे. ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडणार आहात. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होणार आहे. तुमचे सासरच्या लोकांसोबतचे संबंध चांगले असणार आहे.
4/7
सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी एकादशीचा दिवस चांगला असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना भगवान विष्णूच्या कृपेने सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेता येणार आहे. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. एकादशीमुळे घरात धार्मिक वातावरण असेल. लोक धार्मिक कार्यातही सहभागी होणार आहेत. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिवस शुभ असेल, नजीकच्या भविष्यात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले असणार आहे.
5/7
कन्या (Virgo Zodiac)

एकादशीचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप छान असणार आहे. या राशीच्या लोकांच्या बाजूने नशीब असल्याने त्यांच्या सर्व इच्छा एक एक करून पूर्ण होणार आहेत. तुमचे अडकलेले पैसेही परत मिळणार आहेत. तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. उद्या व्यावसायिकांसाठी लाभाची विशेष शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा समजूतदारपणा वाढल्याने तुमचे नाते मजबूत होणार आहे.
6/7
मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी एकादशीचा दिवस चांगला असणार आहे. सकाळी लवकर कामात गुंतल्याने लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला तुमच्या जीवनात मोठा बदल दिसून येईल. तुम्ही घरातील कामे वेळेवर पूर्ण करू शकाल आणि तुमच्या शेजाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारणार आहेत.
7/7
मीन (Pisces Zodiac)
