मुंबईत घर खरेदी करण्याच्या विचारात आहात? पाहा महत्वाची Update

Mumbai News : मुंबईत घराचं स्वप्न आणखी कठीण होण्याची चिन्हं.... वाढत्या किमती पाहून म्हणाल कसं साकार होणार हे स्वप्न....   

Aug 04, 2023, 09:06 AM IST

Mumbai News : दहा बाय दहा.... च्या खोल्या असणाऱ्या चाळी आता मुंबईतून हद्दपार होण्याच्याच वळणावर आहेत. कारण, त्यांची जागा घेतलीये गगनचुंबी इमारतींनी. याच इमारतींमध्ये असणाऱ्या घरांचे दरही गगनासा भिडणारे.  

 

1/7

मुंबई

House Prices Rise In Mumbai housing news

Mumbai News : मुंबई, ही एक स्वप्ननगरी असून, या शहरामध्ये हक्काचं घर असावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. हे स्वप्न साकारण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. पण, आता मात्र या शहरात घर घेण्याचं स्वप्न आणखी कठीण होताना दिसत आहे.   

2/7

घरांच्या किमतीत वाढ

House Prices Rise In Mumbai housing news

घरांच्या किमतीत झालेली वाढ पाहता अनेकांनीच स्वत:च्या घराची इच्छा आवरती घेतली आहे. कारण एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता खरेदीमध्ये जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये काहीशी घट नोंदवण्यात आली आहे.   

3/7

मोठी घट

House Prices Rise In Mumbai housing news

जुलै 2022 च्या तुलनेत घरखरेदीतील ही मोठी घट असून मुद्रांक शुल्कात 28 कोटींची घट असल्याची बाब समोर आली आहे. ज्यामुळं मुंबईत घरांचे घर वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

4/7

मुद्रांक शुल्क सवलत

House Prices Rise In Mumbai housing news

कोरोना काळात दिल्या गेलेल्या मुद्रांक शुल्क सवलत काळात शहरात मोठ्या प्रमाणात घरखरेदी झाली होती. पण, मागील वर्षी सरकारनं पुन्हा नियम बदलत मुद्रांक शुल्कावर 1 टक्के अधिभार लावण्याचा निर्णय़ घेतला आणि इथंच शहरात घर खरेदी करणाऱ्यांचा आकडा घटला.   

5/7

आर्थिक राजधानी

House Prices Rise In Mumbai housing news

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या मुंबईमध्ये घरांच्या दरांमध्ये कायमच तेजी पाहायला मिळाली आहे.   

6/7

महागड्या घराचा व्यवहार

House Prices Rise In Mumbai housing news

देशातील सर्वात महागड्या घराचा व्यवहारही याच शहरात झाला होता. आता मात्र इथं सर्वसामान्यांच्या खिशाला घर खरेदीच्या व्यवहारात चांगलीच फोडणी बसताना दिसणार आहे.   

7/7

घर खरेदीचा विचार करताय?

House Prices Rise In Mumbai housing news

थोडक्यात येत्या काळात तुम्हीही घर खरेदीचा विचार करत असाल तर, कर्जापासून मुद्रांक शुल्कापर्यंतचा सरासार विचार करा, कारण मुंबईत घरं महागतायत...