अंतराळवीर अंतराळात अंघोळ आणि नैसर्गिक विधी कसे करतात?

अंतराळात अंतराळवीरांना अंघोळ आणि नैसर्गिक विधी करण्यासाठी ठराविक पद्धतीनेच या सर्व कृती कराव्या लागतात.

Sep 03, 2023, 22:33 PM IST

international space station : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सध्या 6  अंतराळवीर संशोधन करत आहेत. अंतराळवीरांची जीवनशैली ही सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळी आहे. अंघोळ आणि नैसर्गिक विधी असा रोजच्या दिनचक्रा करण्यासाठी देखील त्यांना फारच परिश्रम करावे लागतात. अंतराळात अंतराळवीर कसे राहतात. जाणून घेवूया.

1/7

पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर अंतराळात हे तरंगते international space station आहे. 

2/7

मल, मूत्र यासाठी ठराविक पाईप आणि बॉक्सचा वापर केला जातो. यामुळे या कामासाठी त्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. काही आंतराळवीर डायपरचा वापर करतात.  

3/7

ब्रश करताना देखील टूथपेस्ट आणि ब्रश हवेत तरंगतात. चूळ भरणे शक्य नसल्यामुळे ते ब्रश केल्यावर पाण्याचा गोळा तोंडात घेवून तो गिळून टाकतात.  

4/7

अंघोळ करणे शक्य नसल्यामुळे अंतराळवीर हे ओल्या कपड्याने आपले शरीर स्वच्छ करतात.  

5/7

अंतराळात अंतराळवीरांना अंघोळ करणे शक्य होत नाही. कारण, अंतराळात पाण्याचा बुडबुडा तयार होतो.   

6/7

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गुरुत्वाकर्षण नसतं. यामुळे तिथे अंतराळवीरांना तरंगत्या अवस्थेत असतात.

7/7

international space station मध्ये सहा अंतराळवीर कार्यरत आहेत.