अ‍ॅक्शन , कॉमेडी आणि हॉरर अजय देवगनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Ajay Devgan Upcoming Movies : अजय देवगन सध्या त्याच्या 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद घेत आहे. 'सिंघम अगेन'ने बॉक्स ऑफीसवर कोटींची कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. 'सिंघम अगेन' हा 'सिंघम' चा तिसरा भाग होता. अजय देवगन या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत होता . अजय देवगनचा हा वर्षातला दुसरा हिट चित्रपट आहे आणि 2025 मध्ये अजय देवगनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच अजय देवगन त्याच्या नव्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालण्याचा तयारीत आहे. 

Intern | Nov 19, 2024, 10:56 AM IST
1/7

अजय देवगनचे येणारे चित्रपट

रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा कॉप युनिव्हर्स मधील पाचवा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने 2 आठवड्यातच  200 कोटींची कमाई केली . प्रेक्षकांना हा चित्रपट तर खूपच आवडला होता . अजय देवगन आता त्याचा पुढील चित्रपटाचे सिक्वेल 2025 मध्ये घेऊन येत आहे. या चित्रपटाची वाट त्याचे चाहते बऱ्याच काळापासून पाहात आहेत.

2/7

'दे दे प्यार दे'

2019मध्ये आलेला अजय देवगनचा हा चित्रपट कॉमेडी आणि रोमॅन्स असा होता. या चित्रपटाची कथा साधी असली तरी एका अनोख्या प्रकारे त्यांनी कॉमेडी आणि रोमॅन्स हटके अंदाजात दाखवला होता . या चित्रपटात तब्बू , अजय देवगन आणि रकुल प्रित सिंग होते. 2 मे 2025ला या चित्रपटाचा सीक्वेल येत आहे.  

3/7

'गोलमाल 5'

'गोलमाल'चा हा पाचवा सीक्वेल पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गोलमाल'च्या प्रत्येक सीक्वेलची गोष्ट थोडी वेगळीचं असते. प्रत्येक सीक्वेलला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. 2017ला प्रदर्शित झालेला चित्रपट 'गोलमाल अगेन' हा हॉरर कॉमेडी या शैलीवर आधारित होता. नेहमीप्रमाणेच या पाचव्या भागातही रोहित शेट्टी एका वेगळ्या गोष्टीसोबत हा चित्रपट काढणार आहे. 

4/7

'रेड 2'

'रेड 2' या चित्रपटाचे शूटिंग या वर्षीपासून सुरु झाले आहे. हा चित्रपट 2018मध्ये आलेल्या 'रेड'चा पुढचा सीक्वेल असणार आहे. पहिला भाग तर प्रेक्षकांना फारच आवडलेला तसचं या भागासाठी देखील प्रेक्षकांना पहिल्या भागाएवढीच अपेक्षा आहे. हा चित्रपट या वर्षीच नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे चित्रपट निर्मात्यांनी तारिख पुढे ढकलली. या चित्रपटामध्ये अजय देवगनसोबत वाणी कपूर आणि रितेश देशमुख दिसणार आहेत. 

5/7

'शैतान 2'

अ‍ॅक्शन, कॉमेडीसोबतचं अजय देवगनने आपली कमाल या हॉरर चित्रपटातही दाखवली.  'शैतान'चा सीक्वेल लवकरच भेटीला येणार आहे. पहिल्या भागात आर माधवनने खलनायकाची भूमिका साकारली आणि हे काम प्रेक्षकांना खूपच आवडले.या चित्रपटाचा पहिला भाग तर सुपर हिट होता.

6/7

'सन ऑफ सरदार'

2012मध्ये आलेला अजय देवगनच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद आला होता. हा चित्रपट कॉमेडी होता. या चित्रपटाच्या पुढच्या भागाचे शुटींग देखील चालू झाले आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिंन्हाच्या ऐवजी मृणाल ठाकूरला घेतले आहे. शूटिंग दरम्यान विजय राजमुळे काही वाद समोर आलेला. हा चित्रपट ब्रिटनमध्ये शूट झाला आहे आणि लवकरच हा चित्रपट आपल्याला मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहे 

7/7

'द्रिश्यम 3'

अजय देवगनचा हा सस्पेंन्स, थ्रिलर चित्रपट बरेच दिवस चर्चेत होता. या चित्रपटाचा पाहिला भाग 2015 मध्ये आलेला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला. त्यानंतर 2022 मध्ये याच चित्रपटाचा दुसरा भाग आला त्याने देखील बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आणि आता याचा तिसऱ्या भागाची वाट प्रेक्षक बघत आहेत हा चित्रपट पुढच्या वर्षी पर्यंत येण्याची शक्यता आहे .