आर्मी कॅन्टीनमध्ये सर्व वस्तू स्वस्तात का मिळतात? जाणून घ्या सवलतीचे कारण

Army Canteen Stores Department : भारतीय सैनिक प्रत्यक्षरित्या सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत असतात. या उपकाराची परतफेड आपल्यापैकी कोणी करु शकत नाही. मात्र भारत सरकार देशाच्या सैनिकांना अशा अनेक सुविधा पुरवते, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळतो. या सुविधांपैकी एक असलेल्या आर्मी कॅन्टीनबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. 

Jul 21, 2023, 16:44 PM IST
1/7

Army Canteen Stores Department

आर्मी कॅन्टीनमध्ये कोणतीही वस्तू बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूपेक्षा खूपच कमी दरात मिळतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही येथून कार आणि बाईक देखील खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगली सूट मिळते. 

2/7

Army Canteen Stores Department

आर्मी कॅन्टीनला प्रत्यक्षात कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंट (Canteen Stores Department)म्हणतात. येथे भारतीय लष्करातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत स्वस्त दरात वस्तू उपलब्ध आहेत. सैन्याच्या कॅन्टीनमध्ये तुम्ही किराणा सामान, स्वयंपाकघरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ऑटोमोबाईल्स आणि दारू देखील खरेदी करू शकता.

3/7

army Canteens run unit

अनेक परदेशी वस्तूही इथे मिळतात. लेह ते अंदमान आणि निकोबार पर्यंत देशभरात एकूण 33 आर्मी कॅन्टीन डेपो आहेत आणि जवळपास 3700 युनिट कॅन्टीन सुरु आहेत.

4/7

army canteen discount

आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या वस्तूंवर लष्कराच्या जवानांसाठी प्रत्येक वस्तूवर फक्त 50 टक्के कर घेतला जातो. जर सामान्य व्यक्तीला वस्तू खरेदीवर 18 टक्के कर भरावा लागला, तर आर्मी कॅन्टीनमध्ये तुम्हाला ती वस्तू फक्त 9 टकेक करासह मिळते. येथे मिळणाऱ्या वस्तूवर केवळ 50 टक्के कर लावण्यात आल्याने येथील वस्तू बाजारपेठेपेक्षा स्वस्त आहे.

5/7

army canteen store

यापूर्वी कोणतीही व्यक्ती आर्मी कॅन्टीनमधून कार्डद्वारे कितीही वस्तू खरेदी करू शकत होती. अशा स्थितीत लष्करी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे नातेवाईक आणि मित्र एवढ्या वस्तू खरेदी करायचे की, लष्करातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वस्तात मिळणारा माल इथे मिळत नव्हता. हे पाहता कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या वस्तूंवर मर्यादा घालण्यात आली. त्यानंतर एखादी व्यक्ती दर महिन्याला एका मर्यादेत वस्तू खरेदी करू शकते.

6/7

army canteen electronics

लष्कराच्या कँटीनमध्ये मद्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सर्व वस्तूंवर बरीच सवलत दिली जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लाभार्थी खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तूची आर्मी कॅन्टीनमधून मागणी करू शकतात.

7/7

Army canteen liquor

दरम्यान, मद्याच्या किमती वाढवल्यानंतर भारतीय लष्कराने आपल्या कॅन्टीनमधील सैनिक आणि अधिकाऱ्यांनाही काहीसा दिलासा दिला आहे. सैनिक आता लष्कराच्या कॅन्टीनमधून 2,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे मद्य 50 टक्क्यांमध्ये खरेदी करू शकतील. आतापर्यंत ही मर्यादा 1000 रुपये होती. (सर्व फोटो - PTI)