जणू चंद्रावरच बांधलंय घर; महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर आहे हे कमाल ठिकाण, एकदा हे PHOTO पाहाच

Rann Utsav 2024 : चंद्रावर जाणं शक्य नाही, पण इथं पोहोचताच वाटेल की अरेच्चा, चंद्रावरच आलोय आपण...   

| Nov 28, 2024, 11:25 AM IST

Rann Utsav 2024 : चंद्रावर घर बांधल्यास ते नेमकं कसं दिसेल? पाहा काही सुरेख फोटो... 

1/9

प्रवास

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

Kutch Rann Utsav: प्रवास, पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांसाठीच काही ठिकाणं कायमच आकर्षणाचा विषय असतात. गुजरातमधील असंच एक ठिकाण या काळात जगाच्या पाठीवर सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

2/9

कच्छचे रण

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

महाराष्ट्राचं शेजारी राज्य असणाऱ्या या गुजरातमधील कच्छचे रण या भागामध्ये सध्या अनेक पर्यटकांची पावलं वळताना दिसत आहेत. निमित्त ठरतोय तो म्हणजे सध्या सुरु असणारा 'रण उत्सव 2024- 2025'.   

3/9

पांढरीशुभ्र वाळू

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

कच्छचे रण हे तिथं असणाऱ्या पांढऱ्याशुभ्र वाळूच्या वाळवंटासाठी, मिठागरांसाठी आणि तेथील संस्कृतीसाठी ओळखलं जातं. इथं होणारा सूर्योदर, सूर्यास्त आणि चंद्रोदय पाहण्यासाठी अनेक पर्यटक का क्षेत्राला भेट देतात.   

4/9

वार्षिक महोत्सव

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या रण उत्सव नामक वार्षिक महोत्सवाची घोषणा केली होती. या महोत्सवामुळं इथं कला, परंपरेला वाव मिळाला असून, येथील अर्थकारण सुधारण्यासही हातभार लागला.   

5/9

संस्कृती

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

कच्छ इथं आल्यावर येथील संस्कृती, स्थानिकांचं राहणीमान इथपासून येथील खाद्यसंस्कृतीतही जणू या भूमीचा आत्मा वास करतो याचीच जाणीव होते.   

6/9

टेंट सिटी

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

कच्छमधील टेंट सिटी अर्थात अनेक तंबू असणारं एक लहानसं शहर या महोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मागील वर्षी जवळपास 7.42 लाख पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी होत कच्छ जवळून अनुभवलं होतं.   

7/9

स्थानिक कला

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

हस्तशिल्प, स्थानिक कला आणि येथील खाद्यसंस्कृतीला जवळून पाहण्याची संधी या महोत्सवामुळं मिळते. इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी 3 स्टार सुविधा असणाऱ्या 400 तंबूंची उभारणी करण्यात आली आहे.   

8/9

पॅकेज

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

इथं येणाऱ्यांसाठी विविध पॅकेजची सोय केली असून, तीन रात्री- चार दिवस (14500 रुपये माणसी), 2 रात्री- 3 दिवस (11000 रुपये माणसी), 1 रात्र-2 दिवस (5500 रुपये माणसी) अशा पॅकेजची आखणी करण्यात आली आहे.   

9/9

सुविधांची रेलचेल

how rann utsav 2024 transforms Gujrat best tourist places travel news

रण उत्सवाच्या निमित्तानं गुजरात पर्यटन विकास मंडळाकडूनही राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी खास सुविधांची रेलचेल असून, इथं आलं असता जणून ही शुभ्र वाळू आपण चंद्रावरच असल्याची जाणीव करून देते.