चहा नेमका कसा बनवायचा? दूध कधी टाकायचं? जाणून घ्या योग्य पद्धत

How To Make The Perfect Cup Of Tea : अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात बेड टी ने करतात. तर काहीजण दिवसभरात नुसता चहाच पित असतात. भारतात या पेयाला कोट्यवधी लोकांचं प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. आपल्याला चहा घरी बनवायला आवडतो जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण तो बनवतो आणि पितो. तरी त्यामध्ये चहापावडरचे प्रमाण चुकते..तुम्हाला जर बेस्ट चहा बनवायचा असेल तर जाणून घ्या सोपी रेसिपी... 

Feb 21, 2024, 16:49 PM IST
1/7

चहा बनवणं हा काही लोकांचा छंद असतो, पण यात आपण अनेकदा काही चुका करतो. जसे की बरेच लोक आधी दूध उकळून त्यात पाणी, साखर आणि चहाची पाने पूर्ण टाकतात, ही पद्धत चुकीची आहे. तर काहीजण चहा जास्त उकळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहाचे सर्व घटक एकत्र करून बराच वेळ उकळल्यास पोटात ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

2/7

दोन कप चहा बनवायचा असेल तर एक कप उकळलेले दूध काढून बाजूला ठेवा.

3/7

यानंतर दोन कप चहासाठी भांड्यात दोन कप पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवा.

4/7

पाणी उकळल्यावर या उकळत्या पाण्यात ठेचलेले आले टाका. (तुम्ही मसाला चहा बनवत असाल तर तुम्ही वेलची, लवंगा किंवा इतर मसालेदेखील घालू शकता.)  

5/7

हे पाणी किमान दोन मिनिटे उकळवा. या उकळत्या पाण्यात चहा पावडर घाला आणि पुन्हा दोन मिनिटे उकळा. त्यानंतर चहामध्ये साखर घाला.

6/7

यानंतर फ्रिजमधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेले दूध घाला. (एकदम फ्रिजमधून काढलेलं दूध घालू नका) मधोमध एका चमचाच्या मदतीने चहा ढवळत राहा.

7/7

दोन मिनिटे दुधात उकळल्यानंतर चहा गाळून घ्या.तुमचा परिपूर्ण चहा तयार आहे.