नवीन वर्षात या कारच्या किंमती वाढणार

Dec 27, 2018, 14:13 PM IST
1/9

टाटा कारची किंमत महागली

टाटा कारची किंमत महागली

टाटा कारची किंमत 40 हजार रुपयांपर्यंत महागली आहे. कंपनीने पॅसेंजर व्हीकल्स पोर्टफोलियोमध्ये एंट्री लेवल स्मॉल कार नॅनो ते प्रीमियम एसयूवी हेक्सा येते. ज्यांची किंमत 2.36 लाख रुपये ते 17.97 लाख रुपयांपर्यंत आहे.   

2/9

ह्युंडाई कारची किंमत महागली

ह्युंडाई कारची किंमत महागली

ह्युंडाई कारची किंमत 30 हजार रुपयांपर्यंत महागली आहे. Hyndai भारतात 3.89 लाख ते 26.84 लाख रुपये कारची किंमत आहे. यामध्ये सेंट्रो हॅचबॅक ते एसयूवीपर्यंत सहभागी आहे. 

3/9

टोयोटाच्या कारची किंमत वाढली

टोयोटाच्या कारची किंमत वाढली

टोयोटा कंपनीची कारची किंमत 4 टक्के कार वाढली आहे. कंपनी आता देशात हॅचबॅक लीवा ते एसयूवी लँड क्रूझर सारख्या कार विकतात. या कारची किंमत 5.25 लाख रुपये ते 1.41 करोड रुपयांपर्यंत आहे. आशा आहे की टोयोटा 2019 मध्ये नवीन कोरोला देखील भारतात लाँच झाली आहे. 

4/9

मारूती कारची किंमत वाढली

मारूती कारची किंमत वाढली

मारूतीच्या कारची किंमत वाढणार असून याचा अद्याप खुलासा झालेला नाही. मारूती सुझुकीची ऑल्टो 800 ते प्रीमियम क्रॉसओवर एक्स क्रॉसपर्यंत कारची विक्री होत आहे. मारूती कारची रेंज 2.53 लाख ते 11.45 लाख रुपयांपर्यंत आहे. 

5/9

स्कोडाच्या गाड्यांची किंमती वाढणार

स्कोडाच्या गाड्यांची किंमती वाढणार

स्कोडाच्या कार 2 टक्के वाढणार आहे. जर आता तुम्ही स्कोडाची कार खरेदी करत असाल तर तुम्हाला अतिशय फायदा होऊ शकतो. एकतर तुम्हाला वाढलेल्या किंमती द्यावा लागणार नाही. 

6/9

रेनोच्या कारच्या किंमतीत वाढ

रेनोच्या कारच्या किंमतीत वाढ

रेनोने 1.5% वाढण्याची घोषणा केली आहे. किंमतीत वाढ झाल्यामुळे मॉडेल आणि वेरिएंटवर 4 हजार रुपये ते 19875 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. 

7/9

निसान कारची किंमत एवढी वाढणार

निसान कारची किंमत एवढी वाढणार

निसार आणि डॅटसनच्या कारच्या किंमतीत 4 टक्के वाढ झाली आहे. भारतात उपलब्ध असलेल्या निसान सीरीज कार 5.03 लाख रुपये ते 2.12 करोडच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये माइक्रा एक्टिव, माइक्रा, सनी, टेरानो एसयूवी आणि जीटी आर स्पोर्ट्स कारमध्ये सहभाग आहे. किंमती वाढल्यानंतर निसान टेरानो टॉप मॉडेलमध्ये 49000 आणि डेट्सगोच्या टॉप वेरिएंटमध्ये 23 हजार रुपयांची वाढ होणार आहे.     

8/9

इसुजुची कार कंपनी एवढी महाग

इसुजुची कार कंपनी एवढी महाग

इसुजुची कार 1 लाख रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. इसुजु देशात युटिलिटी वाहन  V-Max, D-Max, V-Cross आणि SUV Mu-X आणि D-Max पिकअपच्या अनेक मॉडेल्सची विक्री करतात. 

9/9

BMW कार एवढी महाग?

BMW कार एवढी महाग?

बीएमडब्ल्यूच्या कारची किंमत 4% वाढली आहे. भारतात बीएमडब्ल्यूच्या एन्ट्री लेवल कार 3 सीरीज आहे. याची किंमत 39.80 लाख रुपये आहे. एम 760 एलआय एक्सड्राइव कंपनीची सगळ्यात महाग कार आहे. याची किंमत 2.44 करोड रुपये आहे.