ह्युंदाईची पहिली इलेक्ट्रिक कार कोना लॉन्च, एकदा चार्ज केली की ४५२ किमी धावणार

Jul 09, 2019, 15:37 PM IST
1/6

डीसी फास्ट चार्जरने होणार फास्ट चार्ज

डीसी फास्ट चार्जरने होणार फास्ट चार्ज

कोना (KONA) १०० टक्के इलेक्ट्रिक कार आहे. या ३९.२ किलो वॅट लिथियम ऑईल बॅटरी देण्यात आली आहे. कारला साधारण मोडवर ६ तास १० मिनिटांत चार्ज होऊ शकते. यासाठी एसी प्रकारच्या चार्जरने कार चार्ज करावी लागते. 

2/6

५० किमी धावण्यासाठी एका तासाचे चार्जिंग गरजेचे

५० किमी धावण्यासाठी एका तासाचे चार्जिंग गरजेचे

तुम्हाला दररोज ५० किमी प्रवास करायचा असेल तर एका तासाचे चार्जिंग गरजेचे आहे. तर तुम्ही दररोज गाडीने प्रवास करणार असेल तर एका तासाचे चार्जिंग गरजेचे आहे. दरम्यान, कोना कारची विक्री ११ शहरांत करण्यात येणार असून त्यासाठी १५ वितरक नेमण्यात आले आहेत. कारची तीन वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीची ८ वर्षांची वॉरंटी असेल.  

3/6

दोन प्रकारात कार उपलब्ध

दोन प्रकारात कार उपलब्ध

ही कार केवळ 9 .7 सेकंदात 0 ते 100 प्रति तास वेगाने धावू शकते. इलेक्ट्रिक कार कोना दोन आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यात 39 .2 केडब्ल्यूएच आणि 64 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक समाविष्ट आहे. भारतात आता 39 .2 किलोवॅटची आवृत्ती असेल. 39 .2 केडब्ल्यूएच बॅटरी पॅकसह इलेक्ट्रिक मोटर 131 बीएचपी आणि 395 एनएम पीक टॉर्कची निर्मिती करु शकते.  

4/6

फास्ट चार्जिंगची सुविधा अपलब्ध

फास्ट चार्जिंगची सुविधा अपलब्ध

ह्युंदाई कोना या कारमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, कोना इलेक्ट्रिक कारला मोबाइलप्रमाणे जलद चार्ज करु शकतो. ह्युंदाई कोना कार ही भारतात तयार करण्यात आली आहे. चेन्नई येथील प्रकल्पात ही कार बनविण्यात आली आहे.

5/6

सात इंचचा टचस्क्रीन आणि माहितीबाबतची सिस्टम

सात इंचचा टचस्क्रीन आणि माहितीबाबतची सिस्टम

एसयूवी कोनामध्ये इलेक्ट्रिक सनरुफ, १०-वे पॉवरची मागेपुढे करु शकतो अशी चालकाची सीट, वारयलेस फोन चार्जर, एन्ड्राईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबत ७ इंचाचा टचस्क्रीन माहितीपर सुविधा आणि स्टीयरिंग कंट्रोल आदी फीचर्सही आहेत.  या कारची किंमत २५.३० लाख रुपये आहे.  

6/6

सुरक्षिततेसाठी एकदम चांगली

सुरक्षिततेसाठी एकदम चांगली

ही नवी कार सुरक्षिततेसाठी एकदम चांगली आहे. या कारमध्ये सहा एअर बॅग्ज आहेत. ईबीडीबरोबर एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी नियंत्रण, हिल असिस्ट,  मार्गदर्शनबरोबर चांगला रिअर कॅमेरा के साथ रियर कैमरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम अशी या कारमध्ये फीचर्स असणार आहेत. या कारची किंमत २५.३० लाख रुपये आहे.