1/4
तनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल

भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री तनिष्का कपूरच्या नात्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. चहल आणि तनिष्का आयपीएल संपल्यानंतर लग्न करतील, असंही बोललं जात होतं. युझवेंद्र चहलनं या सगळ्या बातम्यांवर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. ट्विटरवर चहलनं या प्रकरणाबद्दल भाष्य केलं आहे.
2/4
तनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल

माझ्या आयुष्यात असं काहीही चाललेलं नाही जसा विचार तुम्ही करत आहात. तनिष्का आणि मी चांगले मित्र आहोत. त्यामुळे माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत. हे माझं वैयक्तिक आयुष्य असल्याचं तुम्ही लक्षात ठेवाल, अशी मला अपेक्षा आहे. अशा अफवा पसरवू नका, अशी माझी मित्रांनाही विनंती आहे. माझ्या लग्नाबाबत पोस्ट शेअर करणं बंद करा. अशी कोणतीही बातमी चालवण्याआधी माहिती घ्या, असा संदेश चहलनं ट्विटरवर दिला आहे.
3/4
तनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल

युझवेंद्र चहल आणि तनिष्का एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तसंच एकमेकांच्या पोस्टही लाईक करतात. या दोघांच्या नात्याबाबत काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत आणि आयपीएल संपल्यावर दोघं लग्न करतील, अश्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण आता या सगळ्या चर्चांना खुद्द चहलनंच पूर्णविराम दिला आहे.
4/4
तनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल
